Salman Khan was not there for promotion but for the purpose of 'The Voice India Kids' set? Just because this happens | प्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर? हे होते नेमके कारण

विविध सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी सेलिब्रेटी मंडळी छोट्या पडद्यावर झळकतात.  छोट्या पडद्यावर आपल्या सिनेमाचं प्रमोशन व्हावं यासाठी अनेकांचा खटाटोप असतो.असाच काहीसा खटाटोप दंबग सलमान खानही करताना दिसतोय.सलमान खानचा आगामी सिनेमा 'टायगर जिंदा है' रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या फक्त सलमान आणि सलमानच पाहायला मिळतोय. आता सध्या सिनेमाचे प्रमोशनही जोरदार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. याच निमित्ताने त्याने द व्हॉईस इंडिया किड्सच्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी त्याने या सिनेमाविषयी रसिकांना खूप सारी माहिती देत फुल ऑन मनोरंजन तर केलेच मात्र या सिनेमाचा आता तिसरा भागही येणार असल्याचेही गुपित उघड केले आहे. 'टायगर जिंदा है' हा सिनेमा 'एक था टायगर'चा सिक्केल आहे.'टायगर जिंदा है' सिनेमा ख्रिसमसच्या मुहुर्तावर रिलीज होणार असल्यामुळे हा सिनेमाही रसिक डोक्यावर घेतील अशी सिनेमाच्या टीमला आशा आहे.तर दुसरीकडे सलमान खान आता भावी प्रोजेक्टची घोषणा करण्यासाठीच या सेटवर आला होता असं बोललं जात आहे. 

Also Read:​रणवीर सिंगने दिला सलमान खानला मसाज! असा दूर केला ताण!!

'द व्हॉईस इंडिया किड्स' मधील स्पर्धकांचे एक से बढकर एक परफॉर्मन्स पाहून  सलमान खान आणि कतरिना कैफ भारावले गेले होते. सलमान खान समोर परफॉर्म करायला मिळणार या संधीचे सोने करण्यासाठी कोणत्याही स्पर्धकाने अजिबात काही कमतरता ठेवली नाही. सगळ्यांच्या मागणीनुसार, कतरिना कैफने तिच्या आगामी चित्रपटातील गमतीदार तर्‍हेने एक सीन केला. तिने या सीनमध्ये झोयाऐवजी टायगरची नक्कल केल्याचे पाहायला मिळाले.कतरिना कैफसोबत त्यातील व्हिलन अबु-उस्मानची भूमिका जय भानुशालीने साकारली. अबु-उस्मानच्या या अवतारामुळे खूपच हशा पिकला होता. कतरिना कैफने यावेळी चित्रपटातील ‘अगर तुझमें दम है तो अब मुझे रोक के दिखा’ या सलमानच्या प्रसिद्ध डायलॉगची नक्कल केली. कतरिनाच्या या नकलेनंतर सलमानने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे अधिकच मजा आली. सेटवरील सुत्रानुसार, “सलमान मजेत म्हणाला की, या चित्रपटाचा अजून एक भाग येणार आहे ज्यामध्ये टायगर (सलमान) आणि झोया दोन्हीची भूमिका कतरिनाच साकारणार आहे.” शोमधील स्पर्धकांसह चित्रपटातील प्रसिद्ध झालेल्या “स्वॅग से स्वागत” या गाण्यावर सलमान आणि कतरिनाने  डान्स देखील केला.
Web Title: Salman Khan was not there for promotion but for the purpose of 'The Voice India Kids' set? Just because this happens
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.