Salman Khan gave audition to 'The Voice India Kids' | 'द वॉईस इंडिया किड्स'मध्‍ये सलमान खानने दिले ऑडिशन!

cnxoldfiles/a>आणि ते चित्रपटाच्‍या प्रमोशनसाठी वरील लोकप्रिय म्‍युझिक रिअॅलिटी शो 'द वॉईस इंडिया किड्स' च्‍या सेटवर आले होते. सलमानने सर्वांना अचंबित केले. तो मंचावर आला आणि म्‍हणाला की तो शान, पापोन,पलक मुच्‍छल व हिमेश रिशेमिया या परीक्षकांसाठी गाणार आहे. सेटवरील एका सुत्राने सांगितले,हे अगदी नकळत घडले. कतरिनाने पापोनचे आसन ग्रहण केले आणि परीक्षकांमध्‍ये सामील झाली. सलमानने त्‍यांना सांगितले की तो गायनामध्‍ये आपले कौशल्‍य आजमावण्‍याचा प्रयत्‍न करत आहे, पण अजून त्‍याला ते जमलेले नाही.तो पुढे म्‍हणाला की तो महान गायक सलमान खानने गायलेली गाणी सादर करत पुन्‍हा तीच जादू निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करणार आहे. तो एक उत्‍तम एन्‍टरटेनर आहे.जोरदार टाळ्यांसह त्‍याने हिरो चित्रपटातील 'मैं हू हिरो तेरा' या गाण्‍यासह परफॉर्मन्‍स सुरू केला. त्‍याचा परफॉर्मन्‍स पाहून सर्वांच्‍या चेह-यावर स्मित हास्‍य आले. त्‍यादरम्‍यान त्‍याने 'किक' चित्रपटातील 'तु ही तुहार जगह'गाणे आणि सुल्‍तान चित्रपटातील 'जग घुमेया' गाणे सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध केले. गाण्‍यांची मेडली संपल्‍यानंतर देखील प्रेक्षकांनी त्‍याला पुन्‍हा गाणे म्‍हणण्‍याची विनवणी केली. मंचावरील उत्‍साह शिगेला पोहोचला होता. तो परीक्षकांकडे आला आणि त्‍याच्‍या परफॉर्मन्‍सबाबत मत व्‍यक्‍ती करण्‍याची विनंती केली. कतरिना परीक्षकाची भूमिका बजावत म्‍हणाली, तुझे नाव काय आणि तू कुठून आला आहेस. त्‍यांच्‍यामधील संवाद खूपच गमतीशीर होता आणि प्रेक्षक सलमान व कतरिनाकडे बघतच राहिले.सलमानने अगदी स्‍पर्धकाप्रमाणे तिच्‍या प्रश्‍नांची उत्‍तरे दिली.कतरिना शेवटी म्‍हणाली, अधिक सराव कर, एकेदिवशी तू चांगला गायक बनशील.इतर परीक्षकांमधील हिमेश रेशमिया व पलक मुच्‍छल काहीसे द्विधा मन:स्थितीत दिसले, कारण ते सलमान खानला आपला मेन्‍टॉर मानतात. पण त्‍यांनी सलमानची थट्टामस्‍करी केली नाही. त्‍यांनी नम्रपणे त्‍याचे कौतुक केले.हिमेश म्हणाला, तुला काय वाटतं... हे गाणं ओरिजनली ज्यांनी गायलंय त्या सलमान भाईपेक्षा तू जास्त चांगला गायलास?पण,मला इथे हे सांगावसं वाटतं की सलमान खान यांनीच माझ्यातील क्षमता ओळखल्या आणि मला या इंडस्ट्रीमध्ये काम दिलं.तसंच,मीसुद्धा तुला एक संधी देणार आहे.त्यामुळे तुला तुझं गायकीचं स्वप्न पूर्ण करता येईल.पलक म्‍हणाली,मी हिमेश सरांच्‍या मताशी सहमत आहे.कोणच सलमान सरांशी तुलना करू शकत नाही. पण मी सलमान सरांना तुला एक संधी देण्‍याची विनंती नक्‍की करेन.सर्व कलाकारांनी या मौजमजेने परिपूर्ण अशा क्षणाचा आनंद घेतला. मुलांनी देखील सलमानने कतरिनासह मंचावर धमाल केली.
Web Title: Salman Khan gave audition to 'The Voice India Kids'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.