दस का दम या कार्यक्रमाच्या स्पर्धकाचे सलमान खानने पूर्ण केले हे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 04:09 PM2018-07-10T16:09:23+5:302018-07-10T16:10:27+5:30

दस का दम या कार्यक्रमात नुकतीच पायल राठी म्हणून एक स्पर्धक आली होती. तिचा पती शिल्पा शेट्टी कुंद्राचा मोठा चाहता असल्याने आपल्या पत्नीला तो प्रेमाने शिल्पा नावानेच हाक मारतो. पायलची एक खास इच्छा सलमानने नुकतीच पूर्ण केली.

salman khan can completed wish of dus ka dum contestant | दस का दम या कार्यक्रमाच्या स्पर्धकाचे सलमान खानने पूर्ण केले हे स्वप्न

दस का दम या कार्यक्रमाच्या स्पर्धकाचे सलमान खानने पूर्ण केले हे स्वप्न

googlenewsNext

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होत असलेला दस का दम हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करत असून त्याच्या अंदाजाने तो आपल्या चाहत्यांना प्रभावित करत आहे. दस का दम या कार्यक्रमाचा हा दुसरा सिझन असून या कार्यक्रमाचा आधीचा सिझन देखील चांगलाच हिट झाला होता. या कार्यक्रमाद्वारेच बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर काही वर्षांनी त्याने बिग बॉस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यामुळे सलमानसाठी दस का दम हा कार्यक्रम खूपच खास आहे. 
दस का दम या कार्यक्रमात नुकतीच पायल राठी म्हणून एक स्पर्धक आली होती. तिचा पती शिल्पा शेट्टी कुंद्राचा मोठा चाहता असल्याने आपल्या पत्नीला तो प्रेमाने शिल्पा नावानेच हाक मारतो. आपणा सर्वांना माहीतच आहे की, शिल्पा शेट्टीने आपले शरीर सौष्ठव खूप चांगल्या तर्‍हेने जपले आहे आणि ती अनेकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. या सडसडीत शिल्पाबद्दलचे हे प्रेम बघून सलमान खानने विशाखापट्टणमच्या पायल राठीला एक आश्चर्याचा धक्का दिला. आश्चर्याची गोष्ट अशी घडली की, पायल राठीला टेलिफोनवरून आपल्या आवडत्या अभिनेत्रीशी संवाद साधण्याची संधी सलमानने दिली. शिल्पाने ती जशी आहे त्याबद्दल तिचे कौतुक करत सांगितले की, तिने स्वतःसारखेच राहावे. इतर कुणासारखे होण्याचा प्रयत्न करू नये. तिने पायलला काही व्यायाम आणि आहाराच्या टिप्स देखील दिल्या. पायलला अशी खात्री वाटते आहे की, ती त्या सूचनांचा नक्कीच अंमल करेल. सलमान स्वतः देखील शिल्पा ज्या रीतीने आपली फिटनेस दिनचर्या सांभाळते ते ऐकून अवाक झाला होता. सेटवरील सूत्राने सांगितले की, “पायल राठीसाठी जणू स्वप्नच खरे झाले होते... कारण तिला तिच्या आदर्श व्यक्तीशी बोलण्याची संधी मिळाली. शिल्पा शेट्टीशी संभाषण झाल्यानंतर पायल राठीमध्ये आलेला जोश तिच्या खेळातून दिसत होता.”
दस का दम या कार्यक्रमाद्वारे सलमान नेहमीच त्याच्या चाहत्यांचे स्वप्न पूर्ण करत असतो. 

Web Title: salman khan can completed wish of dus ka dum contestant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.