Salman Khan believes in guiding me against my harmful biopic | मेरी हानिकारक बिवी फेम ​करण सूचक याबाबतीत सलमान खानला मानतो मार्गदर्शक

करण सूचक सध्या &TV वरील मेरी हानिकारक बिवी या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील त्याचे काम प्रेक्षकांना चांगलेच आवडत आहे. त्याने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. करण त्याच्या अभिनयासोबतच आणखी एका गोष्टीवर मनापासून प्रेम करतो. ती गोष्ट म्हणजे फिटनेस आहे. प्रत्येकाने फिट असले पाहिजे असे करणचे मत आहे. करण स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो. तो मालिकेच्या सेटवर गाडीने न येता सायकलवरून येतो. सायकलवरून सेटवर जाण्याची प्रेरणा त्याने बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानकडून घेतली आहे.  
करणला फिटनेसचे फार वेड असून व्यायामाशिवाय त्याचा एकही दिवस जात नाही. तो एक अभिनेता असल्याने त्याचे शेड्युल खूपच बिझी असते. पण त्यातूनही तो व्यायामासाठी वेळ काढतो. तसेच व्यायामाचा एक भाग म्हणून सेटवर जाताना तो सायकलचा वापर करतो. चालणे आणि व्यायाम करणे हे तर त्याचे सेटवरही सतत सुरूच असते. याबाबत करण सूचक सांगतो, मी कांदिवलीला राहतो आणि मेरी हानिकारक बिवीचा सेट गोरेगावला आहे. त्यामुळे मी सेटवर सायकलनेच जाणे पसंत करतो. माझ्या घरापासूनचे हे अंतर केवळ ६ ते ७ किमी आहे आणि सेटवर पोहोचण्यासाठी मला फक्त ३५ मिनिटे लागतात. सायकलने प्रवास करण्याचा फायदा म्हणजे ट्रफिकमध्ये अडकण्याचा प्रश्न नसतो आणि शिवाय आरोग्यासाठी हे फायदेशीर असते. सलमान खानदेखील सेटवर जाताना अनेक वेळा सायकलचा वापर करतो. सलमान हेच माझे प्रेरणास्थान आहे. सायकल चालवणयाचा केवळ शारीरिक फायदा होतो असे नाही तर दररोज किमान ३० मिनिटे सायकल चालवल्यामुळे स्मरणशक्ती आणि कल्पक विचारशक्तीत सुधारणा होते. तसेच, एक अभिनेता म्हणूनही व्यायाम करणे माझ्यासाठी फारच महत्वाचे आहे. परंतु व्यग्र शेड्युलमधून व्यायामासाठी वेळ काढणे फार कठीण जाते. त्यामुळे व्यायाम करण्यासाठी वेळ मिळाला नाही तर मी सेटवर सायकलने जातो. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, व्यायामाच्या बाबतीत मी स्वतःला व्यायामशाळेच्या मर्यादा घातलेल्या नाहीत, तर बाकीचे मैदानी खेळ खेळणे देखील मी पसंत करतो.

Also Read : 'मेरी हानिकारक बीवी'मध्ये जिया शंकरने घेतली करीना कपूरकडून प्रेरणा
Web Title: Salman Khan believes in guiding me against my harmful biopic
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.