Salman Khan and Katrina Kaif will join together | ​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी

सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या प्रेमप्रकरणाची काही वर्षांपूर्वी चांगलीच चर्चा झाली होती. कॅटरिनाने बुम या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण या चित्रपटात तिने एक बोल्ड भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नव्हता. पहिल्याच चित्रपटातील तिचा परफॉर्मन्स पाहाता तिचे बॉलिवूडमध्ये भविष्य उज्जवल नसल्याचीच चर्चा होती. पण मैंने प्यार क्यों किया या चित्रपटात सलमान खानने कॅटरिनाला मुख्य भूमिकेत घेतले आणि त्यानंतर तिचे करियरच संपूर्णपणे बदलले. तिने त्यानंतर एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. त्याच दरम्यान सलमानसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. पण काहीच वर्षांत त्या दोघांचे ब्रेकअप झाले. कॅटरिनाचे प्रेमप्रकरण रणबीर कपूर सोबत सुरू झाले. पण या दोघांचे नाते देखील खूप काळ टिकू शकले नाही.
सलमान आणि कॅटरिना हे आता नात्यात नसले तरी त्या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री आहे. ते दोघे आजही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. सलमान इंडस्ट्रीतील सगळ्यांना नेहमीच मदत करतो. आता आपल्या एका लाडक्या मित्राच्या मदतीसाठी कॅटरिना धावून आली असल्याचे म्हटले जात आहे. बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या कार्यक्रमाचे सगळेच सिझन आजवर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. या कार्यक्रमाचा ११ वा सिझन जानेवारी महिन्यात संपला होता. आता या कार्यक्रमाचा १२ वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिझनसाठी ऑडिशन्सना देखील सुरुवात झाली आहे. पण यंदाच्या सिझनमध्ये एक ट्विस्ट असणार आहे. कारण यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक जोड्यांमध्ये भाग घेणार आहेत. कलर्स टिव्ही वाहिनीने काही दिवसांपूर्वी त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून ही गोष्ट सगळ्यांना सांगितली होती. कलर्स वाहिनीकडून ट्वीट करून सांगण्यात आले होते की, बिग बॉस १२ लवकरच सुरू होणार असून या वेळी स्पर्धक जोड्यांमध्ये हा खेळ खेळणार आहेत. एवढेच नव्हे तर यंदाच्या सिझनमध्ये सूत्रधार देखील जोडीने असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 
बिग बॉस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करतो. आता त्याच्यासोबत त्याची पूर्वप्रेयसी कॅटरिना कैफदेखील सूत्रसंचालकाच्या भूमिकेत झळकणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Also Read : ​सलमान खानने तुरुंगात मानला आसारामबापूचा सल्ला! आता कधीच करणार नाही ‘हे’ काम!  

Web Title: Salman Khan and Katrina Kaif will join together
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.