Sajjan Re: Do not lie in Parvati Vaj | ​पार्वती वझे दिसणार सजन रे फिर झूट मत बोलोमध्ये
​पार्वती वझे दिसणार सजन रे फिर झूट मत बोलोमध्ये
सजन रे फिर झूट मत बोलो या मालिकेत पार्वजी वझे प्रेक्षकांना जया लोखंडेच्या भूमिकेत दिसणार आहे. सपनो से भरे नैना या मालिकेत तिने काम केले होते. सजर रे फिर झूठ मत बोलो या मालिकेत एक वेगळी भूमिका साकारायला मिळत असल्याचा तिला प्रचंड आनंद होत आहे. पार्वती ही भूमिका साकारण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. पार्वती ही खऱ्या आयुष्यात मराठी असून या मालिकेतदेखील तिला एक मराठी व्यक्तिरेखा साकारायला मिळत असल्याचा तिला अधिक आनंद होत आहे. विशेष म्हणजे तिने या आधी कधीच कोणत्या विनोदी मालिकेत काम केलेले नाही. पण विनोदी मालिकेत काम करायला तिला सध्या प्रचंड मजा येत आहे. ती भूमिकेकडे ती एक आव्हान म्हणून पाहाते. या भूमिकेविषयी पार्वती सांगते, मला दाक्षिणात्य भाषा अजिबात येत नाही. पण तरीही मी दक्षिणेत काम केले आहे. सुरुवातीला तर ही भाषा मला अजिबातच येत नव्हती. पण आता मला ही भाषा समजायला लागली आहे. दक्षिणेत काम करणे तर माझ्यासाठी प्रचंड आव्हानात्मक होते. कॉमेडीबाबत देखील मला तसेच वाटतेय. मी पूर्वी कधीही विनोदी मालिकांमध्ये काम केले नव्हते. पण आता विनोदी मालिकेकडे एक आव्हान म्हणून मी पाहात आहे. 
सजन रे फिर झूट मत बोलो या मालिकेची कथा खोटं बोलणे यावर फिरत असली तरी पार्वतीला तिच्या खऱ्या आय़ुष्यात खोटे बोलता येत नाही. ती खोटे बोलायला गेली तर नेहमी पकडली जाते. याविषयी ती सांगते, मी दहावीत असताना आम्हाला विज्ञान विषयाचे प्रॅक्टिस असायचे. त्याच्या वह्या लिहून पूर्ण झाल्या की आम्हाला त्या शिक्षकाला द्याव्या लागायच्या. एकदा माझे ते असाइनमेंट पूर्ण झाले नव्हते. त्यावर मी शिक्षकांना पटवून दिले की, मी वह्या सबमिट केल्या असून तुमच्याकडून त्या हरवल्या गेल्या आहेत. त्यावर त्यांनी देखील विश्वास ठेवला. पण माझ्या आईने पालक सभेत त्यांना सांगितले की, माझा अभ्यास अद्याप पूर्ण झाला नाही आणि मी वही सबमिट केलेली नाही. हे ऐकून शिक्षकांना धक्का बसला होता आणि माझी चोरी पकडली गेली होती. 
Web Title: Sajjan Re: Do not lie in Parvati Vaj
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.