Saif Ali Khan and Akshay Kumar will appear on the same platform | सैफ अली खान आणि अक्षय कुमार दिसणार एकाच मंचावर

 द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या रिअॅलिटी शोमध्ये अक्षय कुमार सुपर जजच्या भूमिकेत दिसणार आहे. तर  जाकिर खान, मल्लिका दुआ आणि हुसैन दलाल मेंटर्सच्या भूमिकेत दिसणार आहेत. या शोच्या पहिल्या भागात सैफ अली खानने हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी चित्रपट मैं खिलाडी तू अनाडीच्या आठवणींना उजाळा दिला. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. ऐवढेच नाही तर दोघांनी या चित्रपटाच्या शीर्षक गीतावर मंचावर येऊन डान्स केला. यावेळी अक्षयने या गाण्याचा कोरियोग्राफर चिन्नी प्रकाश यांच्यादेखली आठवण काढली.  

 तब्बल नऊ वर्षांनी अक्षय आणि सैफ अली खानला एकत्र स्क्रिन शेअर करताना प्रेक्षक बघणार आहे. डान्सनंतर अक्षय म्हणाला की, ''मी आशा करतो की तुम्हाला आमचा डान्स आवडला असेल. आम्ही दोघे आता या क्षणाला या मुळ गाण्याचे कोरियोग्राफर चिन्नी प्रकाश यांना खूप मिस करतो आहे. जर ते या क्षणी इथे उपस्थित असते तर आमचा डान्स आणखीन चांगला झाला असता.''  

ALSO READ :  ​या अभिनेत्रीमुळे ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला दिला होता चोप

स्टार प्लसवर 30 सप्टेंबरला या शोचा पहिला भाग प्रसारित करण्यात येणार आहे. यात अक्षय आणि सैफची जोडी अनेक वर्षांनंतर त्यांच्या फॅन्सना दिसणार आहे. नव्वदच्या दशकात अक्षय आणि सैफच्या जोडीने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले होते. दोघांची जोडी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 1994 पासून ते 2008 चा काळ यांच्या जोडीने गाजवला होता. दिल्लगी, कीमत, आरजू, टशन यासारख्या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या मंचावर दोघांना एकत्र बघून त्यांचे फॅन्स नक्कीच खुश होती. सैफ आपला आगामी चित्रपट 'शेफ'च्या प्रमोशन आला होता. राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 6 आक्टोबरला रिलीज होतो आहे. सैफ अली खानचा हा चित्रपट जॉन फेवरूच्या याच नावाने आलेल्या चित्रपटाचा ऑफिशिअल रिमेक आहे. चित्रपटात सैफ पंजाबी शेफ बनला आहे. 
Web Title: Saif Ali Khan and Akshay Kumar will appear on the same platform
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.