Sachin Pilgaonkar and Swapnil Joshi attend the 'Ghadge & Soon' series! | 'घाडगे & सून' मालिकेमध्ये सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी यांची हजेरी !

कलर्स मराठीवरील घाडगे & सून मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच घटना घडल्या आहेत. अक्षयला घरातून काढणे, अक्षय आणि कियाराचे एकत्र राहाणे, अमृताचे घाडगे सदन मध्ये परतणे, आणि वसुधाचे कटकारस्थान. पण, आता प्रेक्षकांना काही वेगळे मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. कारण, घाडगे सदनमध्ये महाराष्ट्राचे दोन लाडके कलाकार म्हणजेच सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी येणार आहेत. त्यांच्या आगामी रणांगण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सचिनजी आणि स्वप्नील जोशी दोघांनीही घाडगे & सून मालिकेमध्ये हजेरी लावली. घरामधील सदस्य म्हणजेच माई, भाग्यश्री, अमृता दोघांनाही बघून खुश झाले. या दरम्यान त्यांनी चित्रपटाविषयी त्यांच्या भुमिकेविषयी देखील घाडगे परिवाराला सांगितले. या खास भाग प्रेक्षकांना बघयला मिळणार आहे घाडगे सदन मध्ये आल्यानंतर सचिन पिळगावकर यांनी अण्णा आणि घाडगे परिवाराशी असलेले जुन्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. परिवारातील सदस्यांच्याशी गप्पा देखील मारल्या.

“घाडगे & सून” ही मालिका सुरु झाल्यापासूनच उत्तम कथानक,कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे करून २०० भागांचा पल्ला गाठला आहे. “घाडगे & सून” मालिकेमध्ये प्रत्येकच सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची प्रथा आहे. मग दिवाळी असो वा होळी – रंगपंचमी असो. ​घाडगे & सून या मालिकेद्वारे भाग्यश्री लिमयेने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ही तिची पहिलीच मालिका असली तरी या मालिकेत ती साकारत असलेली अमृता ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत चिन्मय उद्गीरकर तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. चिन्मय आणि तिची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे
Web Title: Sachin Pilgaonkar and Swapnil Joshi attend the 'Ghadge & Soon' series!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.