‘सबसे स्मार्ट कौन?’ या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक रवी दुबेला त्याच्या वडिलांनी दिला हा खास संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 03:05 PM2018-07-20T15:05:20+5:302018-07-20T15:06:09+5:30

‘सबसे स्मार्ट कौन?’ या कार्यक्रमात रवीच्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा नुकताच या कार्यक्रमात सांगितला. आपल्याला तुझा अभिमान वाटतो, असे सांगणारा एक व्हिडिओ संदेश त्यांनी दिला होता.

Sabse Smart Kaun anchor Ravi Dubey received special message from his father | ‘सबसे स्मार्ट कौन?’ या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक रवी दुबेला त्याच्या वडिलांनी दिला हा खास संदेश

‘सबसे स्मार्ट कौन?’ या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक रवी दुबेला त्याच्या वडिलांनी दिला हा खास संदेश

googlenewsNext

आपल्याला तुझा अभिमान वाटतो, असे सांगणारा एक व्हिडिओ संदेश अभिनेता रवी दुबेला त्याच्या वडिलांनी नुकताच पाठविला होता. सध्या ‘स्टार प्लस’वरील ‘सबसे स्मार्ट कौन?’ या गेम शोचे रवी दुबे करत असून प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत आहे. या कार्यक्रमाद्वारे सेटवर गेम खेळत असलेल्या लोकांना पैसे जिंकण्याची संधी मिळत आहे. त्याचसोबत प्रेक्षक घरबसल्या देखील या कार्यक्रमाद्वारे पैसे जिंकत आहेत. 
‘सबसे स्मार्ट कौन?’ या कार्यक्रमात रवीच्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यातील किस्सा सांगितला. आपल्याला ठाऊकच आहे की, रवी हा व्यवसायाने एक अभियंता असला, तरी त्याने आपल्या मनाचा कल ओळखून अभिनयाच्या क्षेत्रात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या तो ‘स्टार प्लस’वरील ‘सबसे स्मार्ट कौन?’ या गेम शोचे सूत्रसंचालन करीत असून या कार्यक्रमातील एक स्पर्धक सुधीर यांनी रवीला त्याच्या वडिलांचा एक व्हिडिओ संदेश नुकताच दाखविला. आपल्याला तुझा किती अभिमान वाटतो, हे त्यात त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले होते. तो संदेश पाहून गहिवरलेल्या रवीने सुधीर यांना मिठी मारली आणि तो म्हणाला, “मी एक सामान्य विद्यार्थी असल्याने मला परीक्षेत किती गुण मिळतील, याची माझ्या वडिलांना नेहमी काळजी लागून राहिलेली असायची. शेवटी मी वडिलांना सांगितलं की एके दिवशी मी सर्वोच्च स्थानावर जाईन आणि पाहा, आज मी कोठे पोहोचलो आहे ते! दिवसेंदिवस माझ्या कारकिर्दीत सुधारणाच होत आहे. बाबा, मला पाठिंबा आणि आधार दिल्याबद्दल मी नेहमीच तुमचा ऋणी राहीन.”
कामाच्या व्यापात आपल्या पालकांची भेट घेणे कठीण होत असलेल्या रवीला अनपेक्षितपणे आपल्या वडिलांचा व्हिडिओ संदेश पाहून आनंद झाला आणि त्यासाठी त्याने कार्यक्रमाच्या सर्व टीमचे आभार मानले.
रवी दुबे अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. जमाई राजा, सास बिना ससुराल, कबूल है यांसारख्या त्याच्या मालिका गाजल्या आहेत. फिअर फॅक्टर, नच बलिये यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये देखील तो झळकला आहे. 

Web Title: Sabse Smart Kaun anchor Ravi Dubey received special message from his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.