मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह या मालिकेतील रुख्सार रेहमानने प्रियांका कंडवालला दिली खास भेटवस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 05:23 PM2018-07-16T17:23:45+5:302018-07-16T17:24:50+5:30

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि नाट्यपूर्ण कथानकाने ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम राखली आहे. या मालिकेत सध्या माहिरा (प्रियांका कंडवाल) आणि ओंकार (राजीवकुमार) यांच्यातील विवाहाचे कथानक सुरू आहे. 

rukhsar rehman give this gift to priyanka kandwal on the sets of mariam khan reporting live | मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह या मालिकेतील रुख्सार रेहमानने प्रियांका कंडवालला दिली खास भेटवस्तू

मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह या मालिकेतील रुख्सार रेहमानने प्रियांका कंडवालला दिली खास भेटवस्तू

googlenewsNext

मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेची कथा ही आजच्या मालिकांपेक्षा वेगळी असल्याने ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेचे चित्रीकरण सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेच्या कलाकारांमध्ये चांगलीच गट्टी जमली आहे.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि नाट्यपूर्ण कथानकाने ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम राखली आहे. या मालिकेत सध्या माहिरा (प्रियांका कंडवाल) आणि ओंकार (राजीवकुमार) यांच्यातील विवाहाचे कथानक सुरू आहे. 
इतर कुटुंबियांप्रमाणेच खान कुटुंबियांनाही विवाहातील अनेक छोट्यामोठ्या कामांनी त्रस्त करून सोडले आहे. पडद्यावरील का होईना, पण आपल्या विवाहाच्या प्रसंगामुळे प्रियांका कंडवाल सध्या फारच खुशीत आहे. पण तिचा हा आनंद केवळ लग्नाच्या कथाभागामुळे नाही. तर या कथाभागात रुख्सर रेहमानने तिला आपल्या लग्नात घातलेला पासा दिल्यामुळे प्रियांका विशेष आनंदित झाली आहे. प्रियांकाला पडद्यावर विवाह करून सासरी जातना पाहून रुख्सार भावनाविवश झाली आणि तिने तिला आपल्या लग्नातील पासा दिला. रुख्सारच्या दृष्टीने या पासाचे मोल अनमोल होते.
रुख्सारच्या या कृतीने प्रियांकालाही आश्चर्याचा धक्का बसला आणि या कृतीचे महत्त्व लक्षात येताच तिच्याही डोळ्यांत पाणी तरळले. तिने हे पासा दागिने आपल्या पडद्यावरील लग्नात वापरण्याचा तसेच ते रुख्सारच्या मुलीच्या वास्तव जीवनातील निकाहसाठी जपून ठेवण्यचा निर्णय घेतला आहे.
रुख्सार रेहमान आणि प्रियांका कंडवाल या मालिकेमुळे एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत हेच यावरून आपल्याला दिसून येत आहे. ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेतील इतर कलाकारांना देखील त्यांच्या मैत्रीचे अप्रूप वाटत आहे. ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेला भविष्यात अनेक वळणं मिळणार असून ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडेल अशी मालिकेच्या टीमला खात्री आहे.

Web Title: rukhsar rehman give this gift to priyanka kandwal on the sets of mariam khan reporting live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.