Romantic track that will come in the series 'Lajar Jhal ji' | 'लागिरं झालं जी' मालिकेत येणार रोमँटीक ट्रॅक

''लय असत्याल मनमौजी पण लाखात एक तूच माझा फौजी''...अजिंक्यसमोर शीतल प्रेमाची अशी थेट कबुली देणार आहे.टेलिव्हिजनवरची खट्याळ जोडी म्हणजे लागिर झालं जीचे अजिंक्य आणि शीतल यांचं प्रेम आता एका नव्या वळणावर पोहोचत आहे.दोघांनीही आपण एकमेकांना आवडत असल्याची मूक कबुली दिली आहे. दोघांमध्ये प्रेमळ नोकझोक देखील होत आहे.पण अजूनही दोघांनी एकमेकांना उघडपणे प्रेमाची कबुली दिली नाही आहे. त्यामुळे आता शीतलने ठरवलं आहे की अजिंक्यला आपल्या मनातली भावना उघडपणे सांगायची. शीतल पवारने एखादी गोष्ट ठरवली की मग ती झाल्याशिवाय राहात नाही.त्यामुळे शीतलचा प्रपोज सुद्धा तिच्यासारखाच लाखात एक होणार आहे. चक्क आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन शीतल अजिंक्यला प्रपोज करणार आहे.आगामी भागात आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये आलेली शीतल आणि अजिंक्यला प्रपोज करण्याची तिची धडपड आपल्याला पाहायला मिळणार आहे.शीतल आणि अजिंक्यला एकमेकांच्या मनातली भावना ठाऊक आहे.पण केवळ प्रेम असून उपयोग नसतो तर ते शब्दांत व्यक्तहीकरावं लागतं. प्रेमात समोरच्या व्यक्तीकडून कमिटमेंट घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं असं शीतलच्या मैत्रिणींना तिला सांगितलं.प्रपोज नेहमी मुलानेच का करावा? मुलीच्या मनात प्रेम आहे तर तिने ते व्यक्त करायला हरकत काय आहे? असा सल्ला देत यास्मिनने सुद्धा शीतलसोबत पैज लावली आहे की अजिंक्यच्या आधी शीतलने त्याला प्रपोज करावं.एनएसएसच्या कॅम्पच्या निमित्ताने आर्मी ट्रेनिंग सेंटरला पोहोचलेली शीतल अजिंक्यला शोधून काढते आणि सगळ्या ट्रेनिंग सेंटरसमोर अनोख्या पद्धतीने अजिंक्यला प्रपोज करते.पण शीतल पाठोपाठ हर्षवर्धन आणि जयश्री सुद्धा आर्मी ट्रेनिंग सेंटरला पोहोचतात.शिवाय घरामध्ये नाना शीतलचं नाव वधूवर सूचक मंडळात नोंदवतात. अशा परिस्थितीत शीतल आणि अजिंक्यमधली ही प्रेमाची कबुली कशी होणार याची एक निराळी उत्सुकता आहे. त्यामुळे रसिकांना आगामी भागात अजिंक्य आणि शीतलसोबत प्रेमाचं लागिरं झाला क्षण अनुभवता येणार आहे.
Web Title: Romantic track that will come in the series 'Lajar Jhal ji'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.