Romantic style seen as Punish Sharma and the Bande Chaura; Celebrated such a day! | पुनीश शर्मा अन् बंदगी कालराचा दिसला रोमॅण्टिक अंदाज; असा सेलिब्रेट केला Rose day!

टीव्ही जगतातील सर्वाधिक वादग्रस्त शो बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये प्रेमात अडकलेले पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा त्यांचे रोमॅण्टिक दिवस एन्जॉय करीत आहेत. ते त्यांचा पहिलाच व्हेलेंटाइन डे वीक सेलिब्रेट करीत असून, त्याचा एक फोटो त्यांनी सोशल अकाउंटवर शेअर केला आहे. दोघांचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे. बिग बॉसच्या घरात पुनीश आणि बंदगीमध्ये प्रेम जुळले होते. त्यावेळी दोघांच्या प्रेमाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. शोबाहेरही या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगत आहेत. 

खरं तर दोघांनी शोमध्ये असताना बºयाचदा कॅमेºयासमोर स्पष्ट केले होते की, त्यांच्यातील प्रेम शोपुरते मर्यादित राहणार नाही. शोनंतरही ते त्यांच्यातील नाते पुढे नेणार आहेत. शोमध्ये या दोघांची लव्ह केमिस्ट्री चांगलीच रंगली होती. प्रेक्षकांनी ती पसंतही केली होती. त्यातच पुनीश बिग बॉसच्या टॉप ४ कंटेस्टेंटपैकी एक राहिल्याने त्याला खूपच लोकप्रियता मिळाली. पुनीश शोमध्ये कॉमनर म्हणून सहभागी झाला होता. 

असो या लव्ह बर्डच्या नव्या फोटोबद्दल सांगायचे झाल्यास, दोघांनी रोज डे निमित्त हातात गुलाब घेऊन एक फोटो पोस्ट केला. तर बंदगीच्या दुसºया हातात पुनीशकडून मिळालेले एक प्लॅकर्ड गिफ्ट दिसत आहे. ज्यावर लिहिले की, ‘तू मेरी गर्लफ्रेंड’ यावर हे दिसून येते की, पुनीशने बंदगीला रोज देतानाच पंजाबी गायक जे स्टारचे ‘तू मेरी गर्लफ्रेंड’ हे गाणेही डेडीकेट केले. शिवाय या दोघांच्या फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये हॉर्ट बलून दिसत आहे. 
 

विशेष म्हणजे या कपलने रोज डे निमित्त त्यांचा एक व्हिडीओही इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. दोघांचा फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांकडून प्रचंड पसंत केला जात आहे. बिग बॉस हा शो सुरू होता तेव्हा अशी अफवा होते की, शोनंतर दोघांमधील प्रेमप्रकरण संपुष्टात येईल, परंतु असे झाले नाही. उलट दोघांमधील प्रेम दिवसागणिक फुलत असल्याचे दिसून येत आहे. 

काही दिवसांपूर्वीच हे कपल सुट्या एन्जॉय करताना बघावयास मिळाले होते. त्यावेळी हे दोघे एकत्र नदी पार करताना दिसत होते. तसेच पुनीश आणि बंदगी या अगोदर दिल्लीतील एक क्लबमध्ये पार्टी एन्जॉय करताना दिसून आले होते. 
Web Title: Romantic style seen as Punish Sharma and the Bande Chaura; Celebrated such a day!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.