The romance of Vijay and Bulbul will be shot on the small screen! | छोट्या पडद्यावर रंगणार विजय आणि बुलबुल यांची प्रेमकथा!

नुकतीच सुरू झालेली नवीन मालिकेत सध्या रोमँटीक ट्रॅक पाहायला मिळत आहे.अल्पावधीतच या मालिकेने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे.'साम दाम दंड भेद'असे या मालिकेचे नाव असून राजकीय ड्रामाही मालिकेत पाहायला मिळत आहे.या सगळ्याघडामोडीसह आता विजय आणि बुलबुल या लव्हबर्डची प्रेमकथा बहरताना दिसणार आहे.भानु उदय विजय ही भूमिका साकारत आहे तर ऐश्वर्या खरे यात बुलबुलची भूमिका साकारत आहे.बुलबुल आणि विजय यांचे दोघांचे कठीण परिस्थितीमध्ये लग्न होते.बुलबुलला विजय आवडतो पण विजय तर तिच्या नजरेला नजरही देत नाही.साहजिकच या दोघांचे हळुङळु बहरणारे प्रेम पाहायला रसिकांनाही मजा येणार असल्याचे मालिकेच्या टीमने सांगितले आहे.हे दोघेही एकमेकांच्या अगदी विरूद्ध आहे आणि त्यांचे व्यक्तिमत्व अगदी वेगळे आहे.पण तरीही स्क्रीनवर ते एक छान जोडीदाराच्या भूमिकेत दिसतील.याविषयी भानु उदय म्हणाला की, “बुलबुलसोबतची एक रोमँटीक लव्हस्टोरी रंगवताना मला खूप मजा येतेय. अगदी अनोळखी व्यक्तींपासून एकमेकांशी ओळख होऊन प्रेमात पडण्यापर्यंतची सगळी दृश्ये यात आहेत. ऐश्वर्या खरे एक उत्तम अभिनेत्री आहे आणि तिच्यामध्ये एक प्रकारच्या अतिशय  निरागसपणा आहे. तिच्यासोबत काम करताना मला खूप छान वाटतंय.”

‘साम दाम दंड भेद’ या मालिकेत सोनल वेंगुर्लेकर आणि ऐश्वर्या खरे या एकमेकींच्या कट्टर वैरी असल्याचे मालिकेत पाहायला मिळते. पण वास्तव जीवनात या दोघी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या आहेत. ‘साम दाम दंड भेद’ या मालिकेत सोनल वेंगुर्लेकर ही मंदिराची, तर ऐश्वर्या खरे ही बुलबुलची व्यक्तिरेखा साकारत आहे.या दोघी एकमेकींच्या शत्रू असतात. पडद्यावर एकमेकींचा सहवास जराही सहन न करणार्‍या या अभिनेत्री कॅमेरा बंद होताच एकमेकींच्या गळ्यात पडतात. त्यांच्यातील वैर हे केवळ टीव्हीच्या पडद्यापुरते असून प्रत्यक्ष जीवनात त्या सच्च्या मैत्रिणीच नव्हे,तर बहिणीच असल्याचे मालिकेच्या सेटवरचे इतर कलाकार सांगतात.या दोघी जेवताना, चित्रपट बघताना, खरेदीला जाताना सतत बरोबर असतात.ऐश्वर्याची स्तुती करताना सोनल म्हणते, “या मालिकेत आम्ही एकमेकींच्या शत्रू असल्याचे दाखवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात आमच्यात  खूप चांगली मैत्री आहे. 
Web Title: The romance of Vijay and Bulbul will be shot on the small screen!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.