This role was to play the role of Mayavi Maling Fame Harshad Arora in Razzi | ​राझी या चित्रपटात मायावी मलिंग फेम हर्षद अरोरा साकारणार होता ही भूमिका

टीव्ही मालिकांमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता हर्षद अरोरा हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राझी’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात प्रेक्षकांना एका मुख्य भूमिकेत दिसणार होता. या चित्रपटात तो कोणती भूमिका साकारणार होता याविषयी त्याने नुकतेच सांगितले आहे. या चित्रपटात आलिया भट्टच्या पतीची भूमिका विकी कौशलने साकारली होती. याच भूमिकेसाठी हर्षदने अनेक ऑडिशन्स दिल्या होत्या. टीव्ही मालिकांमध्ये हर्षदने आजवर साकारलेल्या अनेक भूमिका पाहिल्यामुळेच त्याला ‘राझी’ चित्रपटातील या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. स्वत: हर्षदही या चित्रपटात भूमिका रंगविण्यास खूप उत्सुक होता. त्याने त्याच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी तब्बल आठ तास दिले होते. तो एकाच दिवशी एकामागोमाग एक ऑडिशन्स देत होता. पण या ऑडिशन्समध्ये उत्तम कामगिरी केल्यावरही त्याला ही भूमिका मिळाली नाही. त्याच्याऐवजी या भूमिकेसाठी विकी कौशलची निवड करण्यात आली. यासंदर्भात त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले, “हो, मला ‘राझी’मध्ये भूमिका रंगविण्याची संधी मिळणार होती आणि त्यासाठी मी बऱ्याच ऑडिशन्सही दिल्या होत्या. पण प्रत्येक वेळी तुम्हाला हवं तसंच घडत नाही. पण मी सध्या ‘मायावी मलिंग’ या माझ्या मालिकेवरच लक्ष केंद्रित करीत असून माझ्या चाहत्यांना माझी राजपुत्र अंगदची भूमिका खूप पसंत पडल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे.” 
हर्षद सध्या ‘स्टार भारत’वरील ‘मायावी मलिंग’ या मालिकेत राजपुत्र अंगदची भूमिका रंगवत आहे. या मालिकेमध्ये प्रेक्षकांना त्याचा खूपच वेगळा लूक पाहायला मिळत आहे. हर्षदने आजवर छोट्या पडद्यावर साकारलेल्या भूमिकांपेक्षा या मालिकेतील त्याची भूमिका ही खूपच वेगळी आहे.
‘मायावी मलिंग’ ही मालिका गेल्याच महिन्यात सुरू झाली असून ती एक फॅण्टसी मालिका आहे. हर्षद अरोराशिवाय या मालिकेत शक्ती आनंद, ग्रेसी गोस्वामी, अपर्णाकुमार, वाणी सूद आणि नेहा सोळंकी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेचे कथानक आणि या मालिकेतील सगळ्याच कलाकारांच्या व्यक्तिरेखेचे प्रेक्षक सध्या कौतुक करत आहेत. 

Also Read : ‘मायावी मलिंग’साठी अभिनेता अंकित गुप्ताने घेतले या गोष्टीचे प्रशिक्षण!
Web Title: This role was to play the role of Mayavi Maling Fame Harshad Arora in Razzi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.