In the role of Vinnie Aurora in Colors Laddo 2 will appear | ​कलर्सच्या लाडो २ मध्ये विन्नी अरोरा दिसणार या भूमिकेत

कलर्सचे सामजिक नाट्य लाडो २ या मालिकेने वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आणि लक्षवेधक परफॉर्मन्सने लोकप्रियता मिळवली आहे. ही मालिका अधिकाधिक रंजक व्हावी यासाठी लोकप्रिय अभिनेत्री विन्नी अरोरा या मालिकेत हरवलेली जुही म्हणून प्रवेश करणार आहे. विन्नीचे धीरज धूपर या टिव्ही अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर ती अभिनय क्षेत्रापासून दूर गेली होती. आता ती दोन वर्षांच्या विश्रांती नंतर अभिनयाकडे पुन्हा वळली आहे. तिने अनेक मालिकांमध्ये  प्रमुख भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या प्रवेशाने मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट येणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षक त्यांच्या टेलिव्हिजन स्क्रीनला खिळून बसणार आहेत.  
विन्नी अरोरा कलर्सच्या आवडत्या उडान शो मध्ये दिसून आली होती आणि तिच्या या पुनरागमनाविषयी बोलताना विन्नी सांगते, “मी दोन वर्षांनंतर अभिनय क्षेत्रात परतत आहे. त्यामुळे माझी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडावी यासाठी खूप मेहनत घेत आहे. घरी बसून आराम करण्याच्या आणि निवांत राहण्याच्या माझ्या सवयीवर मात करण्याचा सध्या मी प्रयत्न करत आहे. कारण त्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी मला जास्त कष्ट करावे लागणार आहेत. अस्वस्थता आणि उत्सुकता अशा दोन्ही भावना सध्या माझ्या मनात येत आहेत. कारण अभिनय ही माझी आवड आहे, हे माझ्यासाठी मेडिटेशन सारखे आहे. मी फक्त त्यातील सकारात्मक घटकावर लक्ष देत आहे. मला एका चांगल्या शो मधून परत यायचे होते आणि तो मला मिळाला आहे.”
ना आना इस देस लाडो ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेने जवळजवळ तीन-चार वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले.या मालिकेतील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. ना आना इस देस लाडो या मालिकेची लोकप्रियता पाहाता ना आना इस देस लाडो या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेची कथा आणि कलाकारांचा अभिनय खूप चांगला असल्याचे प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. \

Also Read : ​​या कारणामुळे ना आना इस देस लाडो 2 या मालिकेला मेघना मलिकने ठोकला रामराम
Web Title: In the role of Vinnie Aurora in Colors Laddo 2 will appear
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.