The role of Sneha Tiger appears in the 'Bitti Business Wise' series on And TV | ​अँड टीव्ही वरील 'बिट्टी बिझनेस वाली' या मालिकेत स्नेहा वाघ दिसणार या भूमिकेत

आगामी 'बिट्टी बिझनेस वाली' या मालिकेची कथा ही प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा देणार आहे. या मालिकेची कथा ही खूप चांगली असून तगडी स्टार कास्ट या मालिकेत असणार आहे. बिट्टीच्या आईची भूमिका साकारण्यासाठी अँड टीव्ही वाहिनीने एका लोकप्रिय टेलीव्हिजन अभिनेत्रीची निवड करून तारकांच्या मांदियाळीत भर घातली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रकृती मिश्रा बिट्टीची भूमिका साकारणार आहे तर टेलिव्हिजवरील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा वाघ बिट्टीच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. बिट्टीच्या आईची भूमिका साकारण्याबद्दल स्नेहा वाघ सांगते, "आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत आहेच की राकेश पासवान यांच्या मालिकेत नेहमीच स्त्री पात्राला अधिक महत्त्व दिले जाते आणि त्यांच्या मालिकेतील स्त्री ही कधीच रडणारी नसते तर ती खंबीरपणे सगळ्या संकटांचा सामना देते. त्यामुळे महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची गरज अधोरेखित करणाऱ्या अशा मालिकेचा भाग होणे ही अभिमानाचीच बाब आहे. तुम्ही टीव्हीवर आयांच्या ज्या व्यक्तिरेखा पाहता त्याहून सुलक्षणा फार वेगळी आहे. ती खंबीर स्त्री आहे. आपल्या मुलीने स्वत:च्या हक्कांसाठी ठाम उभे रहावे यासाठी तिच्यासमोर आपण उदाहरण असावे, असे तिला वाटते. एखाद्या स्त्रीला तिचे स्वातंत्र्य मिळावे यामागची प्रेरणा असणारी एक स्त्री साकारणे, हा माझा सन्मान आहे. मला वाटतं, सुलक्षणाचं पात्र बिट्टीइतकंच प्रेरणादायी आहे आणि आता मी ही भूमिका साकारण्यास उत्सुक आहे.  २१ व्या शतकातही भारतातील काही ग्रामीण भागात महिला आजही अनेक समस्यांचा सामना करताहेत, आपल्या भावनांना त्यांना वाट करून द्यायची आहे मात्र त्यांना ते शक्य होत नाही. ही मालिका म्हणजे अशा सर्व महिलांचा आवाज आहे. शहरी वातावरणात राहात असताना ग्रामीण स्त्रियांच्या जीवनाविषयी आपल्याला अनेक वेळा कल्पना देखील नसते. पण त्यांना आजही पूर्णपणे त्यांचे निर्णय स्वतंत्रपणे घेता येत नाहीत."
आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या एका निश्चयी आणि स्वतंत्र मते असणाऱ्या मुलीची कथा म्हणजे बिट्टी बिझनेस वाली. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपताना समाजातील पुरुषप्रधान नियमांशी आणि रुढींशी तिने दिलेला लढा आणि त्यातील यश यावर या कार्यक्रमात भर देण्यात येणार आहे.

Also Read : 'बिट्टी बिझनेसवाली' या मालिकेत प्रकृती मिश्रा साकारणार ही भूमिका
Web Title: The role of Sneha Tiger appears in the 'Bitti Business Wise' series on And TV
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.