हा चिमुरडा साकारतोय छोट्या आंबेडकरांची भूमिका, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 06:30 AM2019-05-28T06:30:00+5:302019-05-28T06:30:00+5:30

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे

The role of the small Ambedkar in this chimuradra, 'Dr. In the book 'Babasaheb Ambedkar' | हा चिमुरडा साकारतोय छोट्या आंबेडकरांची भूमिका, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत

हा चिमुरडा साकारतोय छोट्या आंबेडकरांची भूमिका, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत

googlenewsNext

 

स्टार प्रवाहवरीलडॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा... या मालिकेत बालपणीच्या आंबेडकरांची भूमिका साकारतो आहे बालकलाकार अमृत गायकवाड. छोट्या अमृतचे सध्या सगळीकडेच कौतुक होते आहे. 


अमृत मुळचा नाशिकजवळच्या घोटी गावातला. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड आहे. फावल्या वेळात गाणी ऐकणे हा त्याचा आवडता छंद. मालिकेसाठी जेव्हा ऑडिशन सुरु होती तेव्हा अमृतला त्याबद्दल कळले आणि त्याने थेट ऑडिशनचे ठिकाण गाठले. त्याचा उत्साह आणि हजरजबाबीपणा भाव खाऊन गेला आणि अमृतची छोट्या आंबेडकरांच्या रोलसाठी निवड झाली. अमृत सेटवर सर्वांचाच लाडका आहे. दिग्दर्शक अजय मयेकरांच्या सुचनांचे तो काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळेच सीन अधिकाधिक खुलून येतात. मालिकेत अमृतच्या मोठ्या भावाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आनंदासोबत त्याचे नाते अधिक घट्ट आहे. आनंदाशिवाय एक क्षणही तो राहात नाही. हीच केमिस्ट्री सीनमध्येही दिसून येते. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेचं शीर्षकगीतही अमृतने तोंडपाठ केले आहे. सेटवर सतत तो हे शीर्षकगीत गुणगुणत असतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. अभिनयाचे वेड असलेल्या अमृतला याच क्षेत्रात करिअर करायचे आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका त्याच्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही. तेव्हा अमृत साकारत असलेल्या छोट्या भीमरावांची गोष्ट पाहण्यासाठी न चुकता पाहा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Web Title: The role of the small Ambedkar in this chimuradra, 'Dr. In the book 'Babasaheb Ambedkar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.