​तेनाली रामामध्ये मधुरा नाईक दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 06:42 AM2018-05-09T06:42:56+5:302018-05-09T12:12:56+5:30

सोनी सबवरील तेनाली रामा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेच्या कथेत नेहमीत आपल्याला 'टि्वस्ट अॅण्ड टर्न्स' पाहायला मिळतात. ...

The role of Madura Naik in Tenali Rama will be seen | ​तेनाली रामामध्ये मधुरा नाईक दिसणार या भूमिकेत

​तेनाली रामामध्ये मधुरा नाईक दिसणार या भूमिकेत

googlenewsNext
नी सबवरील तेनाली रामा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेच्या कथेत नेहमीत आपल्याला 'टि्वस्ट अॅण्ड टर्न्स' पाहायला मिळतात. आता या मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पटकथेत काही उत्कंठावर्धक गोष्टी दिसणार आहेतच. पण त्याचसोबतच काही नव्या व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेत मधुरा नाईक या देखण्या अभिनेत्रीचा प्रवेश होणार आहे. श्रीलंकेची राणी मूनमून हिच्या भूमिकेत मधुरा दिसणार आहे. मूनमून हे पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. याआधी अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणारी मधुरा आता एका विनोदी भूमिकेत दिसणार आहे. 
तेनाली रामा या मालिकेत राणी मूनमून आपला पती राजा धर्मपाल याच्यासोबत राजा कृष्णदेवरायाला भेटण्यासाठी येणार आहे. राजाचे आपल्या राणीवर फार प्रेम आहे आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो काहीही करू शकतो असे आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे. राणी मूनमून अतिशय सुंदर आणि प्रतिभावान आहे. पण, राज्याच्या अतिप्रेम आणि अतिकाळजीमुळे तिला आपल्यातील गुण दाखवण्याची संधीच मिळत नाहीये. तिच्या सर्व इच्छा आणि महत्त्वाकांक्षा जणू मनातच बंदिस्त राहिल्यात. राणीला बहुव्यक्तिमत्त्वाचा मानसिक आजार आहे आणि त्यामुळे ती सतत वेगवेगळे वेष धारण करत असते. विजयनगरला आल्यानंतर राजा धर्मपाल तिला कृष्णदेवरायाच्या सुरक्षित देखरेखीला ठेवणार असून तो तिरुपती मंदिरात दर्शनाला जाणार आहे. पण तो  गेल्यानंतर राणी मूनमूनमधील विविध व्यक्तिमत्त्वं सक्रिय होणार असून अगदी विनोदी पद्धतीने सतत वेगवेगळे आणि काहीवेळा विचित्र अवतार ती घेणार आहे. 
मूनमूनच्या व्यक्तिमत्त्वातील या बाबींमुळे ही भूमिका अधिकच विनोदी होणार आहे. या भूमिकेविषयी आणि मालिकेतील आपल्या प्रवेशाबद्दल तेनाली रामामधील राणी मूनमून म्हणजेच मधुरा नाईक सांगते, "या मालिकेत श्रीलंकेच्या राणीची भूमिका साकारण्यास आणि तेनाली रामासारख्या प्रसिद्ध मालिकेचा भाग बनण्यास मी फार उत्सुक आहे. हे एक भन्नाट पात्र आहे. तिची स्मरणशक्ती खूप कमी आहे. त्यामुळे ती सतत आपली ओळख विसरते. मला बऱ्याच काळापासून विनोदी भूमिका साकारायची होती आणि आता ही व्यक्तिरेखा मला ती संधी देणार आहे. संपूर्ण मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळतील."

Also Read : तेनालीरामा मालिकेतील पंकज बेरी सांगतायेत, प्रेक्षकांना माझा खलनायकी अंदाजच अधिक आवडतो

Web Title: The role of Madura Naik in Tenali Rama will be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.