The role of the chef in the forthcoming show 'Jai Kanhaiya Lal Ki' is going to come true | ​आगामी शो ‘जय कन्हैय्या लाल की’ मध्ये विशाल वशिष्ठ साकारणार बावर्चीची भूमिका

लवकरच रसिकांच्या भेटीला एक नवी मालिका येणार आहे. हलके फुलके कौटुंबिक नाट्‌यावर आधारित 'जय कन्हैय्या लाल की' ही मालिका रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.ही मालिका ‘भोजो गोबिंदो’चा रिमेक असणार असून यात तीन प्रमुख व्यक्तिरेखा असणार आहे.जानकी नाथ चौधरी,दाली आणि कन्हैय्या यांचा समावेश असेल.हा शो एक श्रीमंत आजोबा जानकी नाथ चौधरी आणि त्यांची अतिशय लाडावलेली नात दालीची कथा आहे. ह्या शोमध्ये अभिनेता विशाल वशिष्ठला बावर्चीच्या भूमिकेत झळकणार आहे.याबद्दल विशाल वशिष्ठ म्हणाले, “जय कन्हैय्या लाल कीचा हिस्सा बनताना मला खूप आनंद होत आहे.ह्या शो ची संकल्पना खास असून त्यामुळे मी ह्या शोला नकार देऊ शकलो नाही.मी यात कन्हैय्याची भूमिका साकारत असून तो सगळ्‌याच बाबतीत हुशार असल्याते दाखवण्यात आले आहे.त्याच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन असते.आपल्या भन्नाट शक्कल लढवत जेव्हा कन्हैय्या चौधरींच्या घरातील समस्या सोडवेल ते पाहणे निश्चितपणे रंजक असणार आहे. ही मालिका रसिकांचेही भरघोस मनोरंजन करणार अशी मला खात्री असल्याचे विशालने म्हटले आहे .” प्रथमच घरातील बावर्ची केवळ लोकांना जेवणाच्या टेबलवर नाही तर आयुष्यातही एकत्र आणताना टीव्हीवर झळकणार आहे.विशाल वशिष्ठच्या कन्हैय्याच्या व्यक्तिरेखेकडे प्रत्येक समस्येचे समाधान आहे आणि लोकांसोबत कसे वागायचे हे त्याला बरोबर ठाऊक आहे.तो जानकी चौधरी आणि त्यांच्या नातीच्या आयुष्यात अचानक प्रवेश करतो आणि क्षणात गोष्टी बदलतो.तो आपल्या कल्पनेने लोकांचे मन जिंकतो आणि अतिशय लाडावलेल्या नातीला आयुष्याचे धडेही देतो.कन्हैय्याच्या या भूमिकेला विशाल पूर्ण न्याय देईल आणि प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरणार असल्याचा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: The role of the chef in the forthcoming show 'Jai Kanhaiya Lal Ki' is going to come true
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.