In the role of Aruna Irani in the ghost of Zee TV | ​झी टीव्हीवरील भूतूमध्ये अरुणा इराणी दिसणार या भूमिकेत

झी टीव्हीवरील अर्ली प्राईमटाईम फिक्शन मालिका भूतू ही आपल्या मैत्रीपूर्ण छोटी भूत पिहू म्हणजेच अर्शिया मुखर्जीच्या गोड अभिनयामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना या शो च्या खलनायिका मोहिनी शिवांगी वर्मा आणि बॉबी तुषार खन्ना यांच्यात रोचक नाट्‌य पाहायला मिळणार आहे. आता या शोमध्ये आता एका नवीन व्यक्तिरेखेची एंट्री होणार आहे. भूतू या मालिकेत आता दादीच्या रूपात दिग्गज अभिनेत्री अरुणा इराणी दिसणार आहेत. खुबसूरत चित्रपटातील रत्ना पाठक शाह यांच्या व्यक्तिरेखेच्या लूकवर आधारित असलेली अरुणा इराणी यांची ही व्यक्तिरेखा असणार आहे.
दादी खलनायकी प्रवृत्तीची आहे. ती विक्रमची आई आहे. ती अतिशय खाष्ट असल्याने दादीचे वागणे पिहूला अजिबात आवडणार नाहीये. पण दादीच्या अशा काही सवयी आहेत, ज्या शोना शोधून काढणार आहे आणि एवढेच नव्हे तर तिला दीपिका पादुकोणच्या गाण्यांवर नाचण्यासारख्या विचित्र गोष्टी देखील करायला लावणार आहे. भूतू या मालिकेतील आपल्या एंट्रीविषयी आणि या मालिकेतील आपल्या व्यक्तिरेखेविषयी अरुणा इराणी सांगतात, “भूतू या मालिकेत मी विक्रमच्या आईची भूमिका करत असून ती केवळ विक्षिप्तच नाही तर ती खलनायकी वृत्तीची देखील आहे. ती विक्रम आणि अनिंदिता यांना वेगळे करण्यासाठी त्यांच्या आयुष्यात गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करणार आहे. टेलिव्हिजनवर पुन्हा काम करत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. भूतूमध्ये काम करण्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना मी नवीन अवतारात आवडेन आणि माझा हा नवा प्रवास लोकांना आवडेल.”
विक्रम आणि अनिंदिता यांना विभक्त करण्यात दादी यशस्वी ठरेल? पिहूला दादी आवडत नाही, त्यामुळे काही समस्या निर्माण होईल? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना भूतू या मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत. 
अरुणा इराणी यांनी बॉबी, चालबाज, हमजोली, फकिरा यांसारख्या अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी चित्रपटांसोबत मालिकांमध्ये देखील त्यांच्या अभिनयाची छाप पाडली आहे. देस में निकला होगा चाँद, मेहेंदी तेरे नाम की, झाँसी की राणी या मालिकांमधील त्यांच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यांनी मालिकेत काम करण्यासोबतच काही मालिकांची निर्मिती देखील केली आहे. 

Also Read : या मालिकेद्वारे अरुण इराणी परतल्या छोट्या पडद्यावर
Web Title: In the role of Aruna Irani in the ghost of Zee TV
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.