Rohan Mehrani made a transformation to get work, see his new look | काम मिळण्यासाठी रोहन मेहराने केले ट्रान्सफॉर्मेशन,पाहा त्याचा NEW LOOK

टीव्ही अभिनेता रोहन मेहरा सध्या आहे ते ही त्याच्या बदललेला लूकमुळे. रॉकिंग अंदाज, स्टाइल, हटके हेअर स्टाइल आणि दाढी यामुळे रोहन सध्या सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे.सध्याचे अभिनेते अभिनयबरोबरच  लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत.आकर्षक चेहरा आणि पिळदार बॉडी असलेल्या अभिनेत्यांची हिंदी इंडस्ट्रीत काही कमी नाही.त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असणा-या स्पर्धेत टीकायचे असेल तर कुठल्याही इमेजचा शिक्का बसण्या आधी नाविन्य शोधण्याशिवाय पर्याय नाही.यामुळेच रोहन मेहराने चॉकलेट बॉयच्या इमेजमधून बाहेर येण्यासाठी हे ट्रान्सफॉर्मेशन केले असल्याचे बोलले जात आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत रोहन मेहरा नक्ष या भूमिकेमुळे आजही रसिकांच्या लक्षात आहे.साचेबद्ध कामात न अडकता नविन आव्हानं स्विकारावीत या कारणामुळे त्याने ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेला राम राम ठोकला आणि बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होता. त्यानंतर रोहन 'ससुराल सिमर का' मालिकेतही झळकला होता.सध्या रोहन जवळ कोणत्याच  चांगल्या ऑफर  नसल्यामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत तो  नियमितपणे व्यायाम करून आपल्या फिटनेसची काळजी घेताना दिसत आहे.बॉडी पिळदार ठेवण्यासाठी, अॅब्ज कमावण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी रोहन जिममध्ये तासनतास घाम गाळतो आहे. त्यामुळे आगामी काळात रोहन डॅशिंग लूकमुळे त्याची चॉकलेट बॉय इमेज बदण्यात यशस्वी ठरला असला तरी काम मिळणे तितकेच आव्हानात्मक असल्याचे रोहनला वाटते आहे.


तसेच रोहनला आता फक्त छोट्या पडद्यावरच झळकायचे नसून बॉलिवूडमध्येही आपले नशीब आजमवायचे आहे.त्यासाठी तो सध्या त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेत आहे.टीव्ही मालिकांनी मला एक अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली.त्यामुळे मालिकेचा माझा अनुभव सिनेमा करण्यासाठी फायदेशीर ठरेन असे मला वाटते.आधी दोन सिनेमात काम केले असल्याने सध्या मी सिनेमावरचं लक्ष केंद्रित करणार असून सिनेमासाठीच काम करण्याची इच्छा असल्याचे रोहनने सांगितले होते.त्याच्या करिअर व्यतिरिक्त कांची सिंगसोबत त्याच्या अफेअरच्या बातम्या येत असतात. सध्या तरी त्याला त्याच्या करियरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आणखी चार वर्षं तरी तो लग्न करणार नाहीये असे त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते.Web Title: Rohan Mehrani made a transformation to get work, see his new look
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.