Rocky's father arrested in 'Band Baja Closed Door' | 'बँड बाजा बंद दरवाजा'मध्‍ये रॉकीच्‍या वडिलांना अटक
'बँड बाजा बंद दरवाजा'मध्‍ये रॉकीच्‍या वडिलांना अटक

वीकेण्‍डला सर्वोत्‍तम मनोरंजन देणारी सोनी सबवरील मालिका 'बँड बाजा बंद दरवाजा'ने विनोदी व थरारक पटकथेसह प्रेक्षकांना त्‍यांच्‍या टेलिव्हिजनसमोर खिळवून ठेवले आहे. संजीव शर्मा (मुकेश तिवारी) सतत रॉकी (अमितोष नागपाल)सोबत विवाहाची बोलणी करण्‍यासाठी येणा-या प्रत्‍येक मुलीला घाबरवण्‍याचा प्रयत्‍न करतो. असे असताना देखील स्‍नेहा (अशिता झवेरी) आणखी एका भावी वधूला घेऊन येते.

स्‍नेहाला नवीन कल्‍पना सुचते आणि रॉकीला मुलीसोबत बोलण्‍यासाठी ऑनलाइन सेवेचा लाभ घेण्‍याचा सल्‍ला देते. तिचा विचार ऐकून प्रभावित झालेल्‍या रॉकीला विवाहास पात्र मुलगी भेटते आणि तो तिच्‍यासोबत चॅट करू लागतो. पण दोघे एकमेकांना भेटणार असताना तीन भूत त्‍या मुलीचे अपहरण करतात. हे एकून रॉकीला धक्‍का बसतो. पोलिस त्‍या मुलीच्‍या अपहरणासाठी चंदन खुराणाला अटक करतात, ज्‍यामुळे गोंधळामध्‍ये अधिकच भर पडते. वडिलांना सोडवण्‍यासाठी सर्वतोरी प्रयत्‍न करणा-या रॉकीला या संपूर्ण स्थितीमागील धक्‍कादायक तथ्‍य समजते. रॉकीला काय समजते आणि त्‍यामुळे वडिलांना वाचवण्‍यामध्‍ये त्‍याला मदत होईल का?
रॉकीची भूमिका साकारणारा अमितोष नागपाल म्‍हणाला, 'रॉकीने पुन्‍हा एकदा ऑनलाइन डेटिंगच्‍या माध्‍यमातून विवाह होण्‍याची आशा बाळगली. पण यामुळे तो व त्‍याचे वडिल आणखी एका समस्‍येमध्‍ये सापडतात. त्‍याच्‍या वडिलांना तुरूंगामधून बाहेर काढण्‍याची जबाबदारी त्‍याच्‍यावर असते. तो सर्वांसमोर खरे उघडकीस आणतो. या सर्व गोंधळादरम्‍यान प्रेक्षकांना निश्चितच हास्‍यपूर्ण प्रसंग पाहायला मिळणार आहेत.'
चंदन खुराणाची भूमिका साकारणारा राजेंद्र सेठी म्‍हणाला, 'एका मुलीच्‍या अपहरणाच्‍या आरोपाखाली चंदन खुराणाला अटक करण्‍यात आले आहे. याबाबत त्‍याला काहीच माहीत नाही. तो आता त्‍यातून बाहेर पडण्‍यासाठी सर्वतोपरी त्‍याचा मुलगा रॉकीवरच अवलंबून आहे. रॉकी सत्‍याचा शोध घेत असताना काय
घडते हे पाहताना प्रेक्षकांना मजेशीर प्रसंग पहायला मिळणार आहेत.'
 


Web Title: Rocky's father arrested in 'Band Baja Closed Door'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.