In the right to see Rajiv Khandelwal and Surveen Chawla | ​राजीव खंडेलवाल आणि सुरवीन चावला झळकणार हक से मध्ये

कही तो होगा या मालिकेत राजीव खंडेलवाल आणि सुरवीन चावला यांनी एकत्र काम केले होते. पण या मालिकेत ते दोघे नायक-नायिकेच्या भूमिकेत दिसले नव्हते. पण आता प्रेक्षकांना त्यांची जोडी पाहायला मिळणार आहे. एकता कपूरच्या अल्ट बालाजीसाठी ते दोघे एकत्र येणार आहेत. 
अल्ट बालाजीवर प्रेक्षकांना हक से ही नवी वेबसिरिज पाहायला मिळणार आहे. या वेबसिरिजमध्ये राजीव आणि सुरवीन झळकणार असून राजीवची ही पहिलीच वेबसिरिज आहे. या वेबसिरिजमध्ये प्रमुख भूमिका कोण साकारणार याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. पण यात राजीव आणि सुरवीनची वर्णी लागणार आहे. 
हक से या वेबसिरिजमध्ये सिमोन सिंग आणि करणवीर शर्मादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हक से या मालिकेत काश्मीरमधील एका कुटुंबीयांची कथा पाहायला मिळणार आहे. तिथल्या पारंपारिक रुढींमुळे मुलींना कोणकोणत्या परिस्थितींचा सामना करावा लागतो हे या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. मेहेर, जन्नत, बानो आणि अमल अशा काश्मीरमध्ये राहाणाऱ्या चार मुलींची ही कथा आहे. या वेबसिरिजचे दिग्दर्शन अदय भुयान करत असून त्यांनी अमित सहानी की लिस्ट, फिर से यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. तसेच त्यांनी काही वेबसिरिजचे देखील दिग्दर्शन केले होते. 
हक से या वेबसिरीजद्वारे सिमोन सिंग आणि वकार शेख अनेक वर्षांनी एकत्र आले आहेत. त्या दोघांनी हिना या प्रसिद्ध मालिकेत एकत्र काम केले होते. ते दोघे हिनामध्ये नायक-नायिकेच्या भूमिकेत झळकले होते.  

Surveen Chawla
Web Title: In the right to see Rajiv Khandelwal and Surveen Chawla
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.