Ricky Patel's pranks on 'Jeevaniman Bhav' set | ‘आयुष्यमान भव’च्या सेटवर रिकी पटेलच्या खोड्या

'आयुष्यमान भव’ या आगळ्या सूडकथेत क्रिशची भूमिका साकारणारा बालकलाकार रिकी पटेल हा सेटवर एक खोडकर मुलगा म्हणून ओळखला जातो.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेटवरील उदास किंवा मरगळलेल्या वातावरणात चैतन्य निर्माण करण्याची क्षमता रिकी पटेलमध्ये आहे.त्याच्या खोडकर वागणुकीमुळे तो सेटवर आनंदी वातावरण निर्माण करतो. तो सेटवरील सर्वांचा लाडका आहे.तसा तो भरपूर मिश्किल आणि खोडकर स्वभावाचाही असून त्याच्या गमतीजमतींमुळे कधी कधी प्रसंगाच्या मध्येच कलाकारांना हसू फुटते. याबद्दल रिकीला विचारले असता तो म्हणाला, “दुस-याला हसविण्याची कला सर्वांकडेच नसते; पण माझ्याकडे ही दैवी देणगी असल्याने मी स्वत:ला सुदैवी समजतो. सेटवर सर्वांनाच मी आवडतो आणि ते माझे भरपूर लाड करतात. माझ्या मस्करीमुळे मी सेटवरचं वातावरण हसतंखेळतं ठेवतो.”


रिकी पटेलने दिया और बाती हम या मालिकेत तर जोधा अकबर या चित्रपटात काम केले आहे. तो आता इंतेकाम एक मासूम का या आगामी मालिकेत झळकणार आहे आणि विशेष म्हणजे सलमानच्या ट्युबलाइट या चित्रपटात तो झळकला होता.केवळ आठ वर्षांचा असलेल्या रिकीने अभ्यास आणि अभिनय या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या मॅनेज करतो.मालिकेतील आपला प्रत्येक प्रसंग अचूक चित्रीत झाला पाहिजे, यासाठी रिकी भरपूर मेहनत घेतो; त्याचवेळी चित्रीकरणामुळे आपल्या अभ्यासावर परिणाम होणार नाही, याचीही तो काळजी घेताना दिसतो. तो रोज सकाळी शाळेत जातो आणि संध्याकाळी मालिकेसाठी चित्रीकरण करतो. तसेच प्रत्येक प्रसंगाचे चित्रीकरण पार पडल्यावर तो त्या दिवशी शाळेत जे शिकविलेले असते, त्याची उजळणी करतो.त्याच्या या वेळापत्रकाबद्दल आम्ही रिकीला विचारले असता रिकी म्हणाला, “हो, मी सकाळी शाळेत जातो आणि संध्याकाळी सेटवर येतो. ही मालिका आणि माझा अभ्यास या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी सारख्याच महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा मी प्रयत्न करीत आहे. या मालिकेचे सर्व कर्मचारी फारच सहकार्य करणारे असून मला या दोन्ही गोष्टी साध्य करता येतात असे तो सांगतो.
Web Title: Ricky Patel's pranks on 'Jeevaniman Bhav' set
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.