गर्ल्स होस्टेलमधून होस्टेलच्या आठवणींना मिळणार उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 01:42 PM2018-12-07T13:42:07+5:302018-12-07T13:50:53+5:30

होस्टेल लाइफ म्हणजे कोणाच्याही आयुष्यातील असे दिवस, ज्यात रात्रीचे रूपांतर दिवसात होते आणि मित्रमंडळींचे रूपांतर कुटुंबियांमध्ये. हे विधान अगदी खरे आहे

Reminisce the magical memories of hostel life with girlyapa’s Girls Hostel | गर्ल्स होस्टेलमधून होस्टेलच्या आठवणींना मिळणार उजाळा

गर्ल्स होस्टेलमधून होस्टेलच्या आठवणींना मिळणार उजाळा

googlenewsNext
ठळक मुद्देही तीन भागांची वेबसिरीज फिरते ती वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या चार मुली आणि त्यांच्या आयुष्यांभोवती.

होस्टेल लाइफ म्हणजे कोणाच्याही आयुष्यातील असे दिवस, ज्यात रात्रीचे रूपांतर दिवसात होते आणि मित्रमंडळींचे रूपांतर कुटुंबियांमध्ये. हे विधान अगदी खरे आहे. गर्लीयापा वाहिनी व्हिस्परच्या साथीने आपली नवीन मालिका 'गर्ल्स हॉस्टेल' प्रेक्षकांसमोर आणत होस्टेलचे अनुभव ताजे करण्यास सज्ज आहे. आजपासून भेटीला येणाऱ्या या बेवसिरीजमध्ये प्रेक्षकांना त्यांना पटणाऱ्या गोष्टीसाठी ठाम उभे राहण्यास तसेच स्वत:च्या नियमांवर जगण्यास प्रोत्साहन देण्यासाठी #MereLifeMereRules या घोषवाक्यासह येत आहे.

ही तीन भागांची वेबसिरीज फिरते ती वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या चार मुली आणि त्यांच्या आयुष्यांभोवती. या सगळ्या सेंट जॉन्स डेंटल कॉलेजमध्ये  शिकत आहे आणि होस्टेलमध्ये राहत आहेत. टीव्ही अभिनेत्री अहसास चन्ना रिचाची भूमिका करणार आहे. ही नागपूरहून नुकतीच आलेली १८ वर्षांची मुलगी आहे. सिमरन नाटेकर मिलीच्या भूमिकेत आहे. ही एका श्रीमंत कुटुंबातील लाडावलेली मुलगी आहे. सृष्टी श्रीवास्तव ज्योची भूमिका साकारत आहे. ही मुलगी आयुष्य तिला हवे तसे जगते, तिला वाढवण्यात आले आहे तेही टॉमबॉयप्रमाणे. त्याचप्रमाणे टीव्ही अभिनेत्री पारुल गुलाटी झहीरा या सर्वार्थाने कॉलेज क्वीन असलेल्या एका मुलीची भूमिका करत आहे. गर्ल्स होस्टेल ही या सामान्य मुलींची गोष्ट आहे. या सगळ्या एकत्र येतात आणि आपल्या आयुष्यातील मौल्यवान अनुभव एकमेकींशी वाटून घेतात.

अहसास चन्ना (रिचा) म्हणाली, “होस्टेल लाइफ आपल्याला स्वत:बद्दल आणि एकंदर आयुष्याबद्दल खूप काही शिकवते यावर माझा खरोखर विश्वास आहे. माझी यातली व्यक्तिरेखा रिचा तिच्यासाठी काय योग्य आहे हे ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. गर्ल्स होस्टेलसाठी शूटिंग करताना खूप मजा आली आणि आम्ही चौघी आता खरोखरच्या रूममेट्ससारख्या झालो आहोत.”

सिमरन नाटेकर (मिली) म्हणते, “प्रत्येक मुलीपुढे काही अपेक्षा ठेवल्या जातात आणि तिने त्या पूर्ण करणे अपेक्षित असते. मात्र, तिला स्वत:चे आयुष्य आपल्या पद्धतीने जगावेसे वाटते अशीही एक वेळ येते. प्रत्येकाच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या भागावर प्रकाश टाकणाऱ्या गर्ल्स होस्टेल या मालिकेचा भाग होता आले याबदद्ल मला कृतज्ञ वाटत आहे. या काळात प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या स्वत: अनेकविध भावनांचे अनुभव घेते. होस्टेलमधील मौजमजेने भरलेल्या रात्रींपासून ते कॉलेजातील परस्परविरोधी गटांपर्यंत सगळ्याची चव ही मालिका प्रेक्षकांना देणार आहे. प्रेक्षकांपैकी अनेकजण यामध्ये स्वत:ला बघू शकतील.”

सृष्टी श्रीवास्तव (जो) म्हणाली, “होस्टेल लाइफ हे भीतीदायकही ठरू शकते. पूर्णपणे अनोखळी लोकांसोबत अनेक वर्षे काढायची. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे जसा काळ जातो, तसे तुम्ही त्यांना ओळखू लागता. आणि होस्टेल हे घर होऊन जाते. हा प्रवास खूप प्रेमाने तसेच तिरस्कारानेही भरलेला आहे आणि हे अनुभव आयुष्यभर तुमच्या सोबत राहतात. काही खरोखरीच कठीण परिस्थितींचा सामना कसा करायचा याचे शिक्षण या मालिकेने मला दिले आहे. ही तुमच्यासोबत कायम राहणारी रोलर कोस्टर सफर आहे.”

पारुल गुलाटी (झहीरा) म्हणाली, “एका पूर्णपणे मुलींनी भरलेल्या होस्टेलमध्ये राहणे कसे वाटते याचा अनुभव मला ‘गर्ल्स होस्टेल’साठी शूटिंग करताना आला. मी नियमितपणे कॉलेजला गेलेले नाही त्यामुळे या मालिकेने मला कॉलेज जीवनाचा अनुभव दिला. या मुली त्या निभावत असलेल्या व्यक्तिरेखांसारख्या अजिबात नसल्या तरी, आम्ही कोणत्या टोकापर्यंत जाऊ शकतो हे आम्ही यातून दाखवले आहे. या शोसाठी शूटिंग करणे खूपच गमतीचे होते आणि एक पूर्णपणे वेगळा अनुभव होता. आमच्या या मजेदार गोष्टीबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहोत.”

गर्ल्स होस्टेल ही गर्लीयापाची वेबसिरीज असून, चैतन्य कुंभकोणम यांनी दिग्दर्शित केली आहे. ही कथा डेंटल कॉलेजच्या ४ विद्यार्थिनींचे दैनंदिन आयुष्य उलगडते. या चौघी त्यांच्या वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी एकत्र आल्या आहेत; हुकूमशाही वृत्तीचे पालक, अतिरेकी वॉर्डन्सपासून त्यांना भेटणाऱ्या दुष्ट स्वभावाच्या मुलींपर्यंत अनेक समस्या त्यांच्यापुढे आहेत. गर्ल्स होस्टेल ही एक विनोदी रोलर कोस्टर सफर असून यात खऱ्याखुऱ्या मानवी भावनांना कोणालाही आपलेच वाटतील अशा होस्टेलमधील अनुभवांची जोड देण्यात आली आहे.

Web Title: Reminisce the magical memories of hostel life with girlyapa’s Girls Hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.