Remembering Salman Khan's earnings from 'Bigg Boss 11' and forgetting the earnings of 'Tiger is alive'! | ‘बिग बॉस ११’मधून सलमान खानची कमाई वाचून ‘टायगर जिंदा है’ची कमाई विसरून जाल!

सुपरस्टार सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ने देशभरात २४ दिवसांमध्ये ३२५ कोटी रुपयांची कमाई करीत बॉक्स आॅफिसवर दबदबा निर्माण केला. या चित्रपटाने सलमानच्याच ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुलतान’चा रेकॉर्ड ब्रेक केला. हा चित्रपट म्हणजे सलमानच्या यशस्वी कारकिर्दीतील मानबिंदू ठरला, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. परंतु सलमानचा जलवा केवळ मोठ्या पडद्यावरच बघावयास मिळाला असे नाही, तर छोट्या पडद्यावरही त्याने आपली हुकूमत दाखवून दिली. होय, गेल्या तीन महिन्यांपासून तो ‘बिग बॉस ११’च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर आपला जलवा दाखवित आहे. रविवारीच त्याच्या या रिअ‍ॅलिटी शोचा ग्रॅण्डफिनाले पार पडला असून, त्यात टीव्ही अभिनेत्री अंगुरी भाभी ऊर्फ शिल्पा शिंदेने ड्रामा क्वीन हिना खानवर मात करीत बिग बॉसच्या सीजन ११ चे टायटल आपल्या नावे केले. शिल्पाने १५ आठवड्यांच्या मानधनासह ४४ लाख रुपयांचे बक्षीस मिळविले. थोडक्यात या शोने शिल्पाला मालमाल केले. आता तुम्ही विचार करीत असाल की, जर शोच्या विजेत्यावर एवढे पैसे उधळले जात असतील तर शोचा होस्ट असलेल्या सलमान खानच्या खात्यात किती रुपये जमा झाले असतील? 

टेलीचक्कर डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, सीजन-१० मध्ये सलमान खानने एका एपिसोडसाठी ८ कोटी रुपये चार्ज केले होते. तर सीजन-११ मध्ये हा आकडा ११ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. म्हणजेच सलमान एका आठवड्यात दोन एपिसोड होस्ट करीत असल्याने त्याला निर्मात्यांना तब्बल २२ कोटी रुपये मोजावे लागले. संपूर्ण सीजनमध्ये त्याने (१५ आठवडे) ३० एपिसोडची शूटिंग केली. अशात त्याची या सीजनमधील कमाई ही तब्बल ३३० कोटी रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. धक्का बसला ना? परंतु हे खरं आहे. सलमानने त्याच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटापेक्षाही ‘बिग बॉस सीजन ११’मधून अधिक कमाई केली आहे. दरम्यान, बिग बॉसचा हा सीजन जेव्हा सुरू झाला होता, तेव्हा त्याला पत्रकारांनी त्याच्या फिसबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्याने या प्रश्नाचे उत्तर न देता केवळ स्माइल दिली होती. याच प्रश्नाचे उत्तर देताना वायकॉम १८ चे सीएफओ राज नायक यांनी म्हटले होते की, ‘स्वस्तात सलमान खान मिळतो काय?’ आता ज्या पद्धतीने आकडे समोर आले आहेत, त्यावरून नक्कीच सलमान खान स्वस्तात मिळत नाही, हे स्पष्ट झाले आहे. 
Web Title: Remembering Salman Khan's earnings from 'Bigg Boss 11' and forgetting the earnings of 'Tiger is alive'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.