For this reason, there was no need to find work in Nikitin Dhirala Industries | या कारणामुळे निकितिन धीरला इंडस्ट्रीत काम शोधायची गरज पडली नाही

लोकप्रिय बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता निकितिन धीर सध्या स्टार प्लसवरील शो इश्कबाजमध्ये खलनायकाची भूमिका साकारत असून त्याच्या मते त्याची शरीरयष्टी असाधारण असली तरी त्याला इंडस्ट्रीमध्ये चांगले काम मिळाले आहे.बॉलिवूडमध्ये 'दबंग', 'चेन्नई एक्सप्रेस','हाऊसफूल'अशा चित्रपटांमध्ये आपल्या खलनायकी व्यक्तिरेखांसाठी ओळखला जाणारा निकितिन म्हणतो की इंडस्ट्रीमध्ये कामाच्या बाबतीत तो नेहमीच भाग्यवान ठरला आहे आणि त्याची असाधारण शरीरयष्टी खरंतर त्याच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे.निकितिन म्हणाला,“माझ्या उंची आणि शरीरयष्टीबद्दल कधीच माझ्या मनात असुरक्षिततेची भावना नव्हती.खरंतर मी आजतागायत जे काही काम केले आहे हे मला माझ्या या शरीरयष्टीमुळेच मिळाले आहे.असे असले तरी इंडस्ट्रीमध्ये सर्वांनाच काही ना काही काम मिळू शकते आणि अनेक व्यक्तिरेखा खास व्यक्तीनुसार निर्माण केल्या जातात.मला आनंद आहे की मला चांगले ऑफर्स मिळत गेल्या आणि मी खरंच खूप आनंदात आहे.”निकितिन सध्या इश्कबाजमध्ये रावणची भूमिका साकारत आहे.‘इश्कबाझ’मालिकेत वीर प्रताप चौहानची व्यक्तिरेखा साकर करणा-या निकितीन धीर या अभिनेत्याने आजवर आपल्या कारकीर्दीत सर्वाधिक भूमिका खलनायकाच्याच केल्या आहेत.या अनेक खलनायकांच्या भूमिकांमध्ये शाहरूख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’चित्रपटातील थंगबलीची भूमिका आपली सर्वात आवडती भूमिका असल्याचे निकितीन धीरने सांगितले.

निकितीनने सांगितले,“थंगबली ही अशी व्यक्तिरेखा आहे जी साकारताना माझ्यातील अभिनेत्याचा कस लागला.कारण त्यावेळी माझ्यासमोर तितकाच तगडा अभिनेता होता शाहरूख खान.तो अतिशय समजुतदार तर आहेच,पण तो तुम्हाला अधिकाधिक उत्तम अभिनय करण्यास प्रवृत्त करतो.'थंगबली' हा नायकाच्या (शाहरूख खान) विरोधात असल्याने तो खलनायक बनतो. त्यामुळे शाहरूखच्या विरोधात प्रमुख खलनायकाची भूमिका मला रंगवता आली, याचा मला आनंद वाटतो.”

निकीतीन धीरच्या पर्सनल लाईफच्याही खूप चर्चा होत असतातनिकितीन धीरने टीव्ही अभिनेत्री क्रतिका सेनगरसह लग्न केले आहे.दोघेही छोट्या पडद्यावर काम करत असल्याने त्यांना मालिकेच्या चित्रीकरणात ते बिझी असतात त्यामुळे त्या दोघांना एकमेकांना वेळ देता येत नाही.पण या दोघांनीही आपल्या कामातून वेळ काढून लग्नाचा वाढदिवस चांगला साजरा करण्याचे ठरवले आहे. ते दोघे नुकतेच युरोपला फिरायला गेले आहेत.तिथेच ते त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करणार आहेत.
Web Title: For this reason, there was no need to find work in Nikitin Dhirala Industries
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.