This is a reason Taarak mehta ka ooltah chashmah iyer aka tanuj mahashabde is wearing wig | या कारणामुळे सध्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत अय्यर घालतोय विग
या कारणामुळे सध्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत अय्यर घालतोय विग

तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या बनल्या आहेत. या मालिकेत तनुज महाशब्दे अय्यरची भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूपच चांगली पसंती मिळत आहे. दाक्षिणात्य लकबीमध्ये संवाद म्हणण्याची त्याची स्टाइल प्रेक्षकांना खूपच आवडते. तनुज हा खऱ्या आयुष्यात महाराष्ट्रीयन असला तरी तो या मालिकेत एका दाक्षिणात्य व्यक्तीची भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारत आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत अय्यर म्हणजेच तनुज गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळत आहे. तनुज गेल्या काही दिवसांपासून मालिकेत विग घालताना दिसत आहे. तनुज मध्ये झालेला हा बदल त्याच्या चाहत्यांना लगेचच जाणवत आहे. तनुजने विग घालायला का सुरुवात केली आहे असा प्रश्न तनुजच्या चाहत्यांना पडला आहे. तनुजने विग घालण्यामागे एक कारण आहे. तनुजची आई शैला यांचे ४ जूनला म्हणजेच गेल्या महिन्यात इंदोरमध्ये निधन झाले. शैला या गेल्या कित्येक महिन्यांपासून आजारी होत्या. त्यामुळे तनुज चित्रीकरण सांभाळून अनेकवेळा इंदोरला जात होता. तनुज हा मुंबईत राहात असला तरी त्याचे कुटुंबिय गेल्या अनेक वर्षांपासून इंदोर मध्ये राहात आहे. आईच्या निधनानंतर तुनज गेल्या कित्येक दिवसांपासून कुटुंबियांसोबत इंदोरमध्ये राहात होता. त्यामुळे त्याने २० दिवसांचा ब्रेक देखील घेतला होता. आईच्या मृत्यूनंतर विधींचा एक भाग म्हणून तनुजने टक्कल केले आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत त्याला टक्कल असल्याचे दाखवणे शक्य नव्हते. त्यामुळे तो चित्रीकरणासाठी सध्या विग लावत आहे. 
तनुज विग का घालत आहे हा प्रश्न गेल्या कित्येक दिवसापासून त्याच्या फॅन्सना पडला होता. पण या मालिकेत बबिताची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवरून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. 


Web Title: This is a reason Taarak mehta ka ooltah chashmah iyer aka tanuj mahashabde is wearing wig
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.