For this reason, Kareena Kapoor refused to give to India's Next Superstar | ​या कारणामुळे करिना कपूरने इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्सला दिला नकार

‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’ हा कार्यक्रम स्टार प्लस वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात आपल्याला परीक्षकाच्या भूमिकेत बॉलिवूडमधील दोन दिग्गज दिग्दर्शक पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे परीक्षण करण्यासाठी कार्यक्रमाच्या टीमने करण जोहर आणि रोहित शेट्टी या बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाच्या जोडीला विचारले असून त्यांनी यासाठी होकार देखील दिला आहे. त्यांच्यासोबत एखादी प्रसिद्ध अभिनेत्री या कार्यक्रमाचा भाग असावी अशी या कार्यक्रमाच्या टीमची इच्छा आहे आणि त्यासाठी त्यांनी आजची आघाडीची अभिनेत्री करिना कपूरला विचारले आहे. करिना आजवर कधीच छोट्या पडद्यावर झळकली नाही. त्यामुळे करिनाच्या फॅन्सना तिला छोट्या पडद्यावर पाहायला नक्कीच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री होती आणि त्यातही करण जोहरच्या कभी खुशी कभी गम आणि रोहित शेट्टीच्या गोलमाल या चित्रपटात करिनाने काम केले आहे. त्यामुळे त्या तिघांची केमिस्ट्री कार्यक्रमात खूप चांगल्याप्रकारे जमून येणार यात कार्यक्रमाच्या टीमला काहीच शंका नव्हती. त्यामुळे करिनाच या कार्यक्रमाचा भाग असावी यासाठी ते प्रयत्न करत होते. पण करिनाकडे सध्या तारखा शिल्लक नसल्याने तिने या कार्यक्रमासाठी नकार दिला आहे. वीरे दी वेडिंग या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात करिना व्यग्र असल्याने करिनाला ही ऑफर स्वीकारता येणार नाही असे तिने कार्यक्रमाच्या टीमला सांगितले आहे. 
करिनाने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. एवढेच नव्हे तर करिना गर्भवती असताना देखील ब्रेक न घेता ती चित्रपटांचे चित्रीकरण करत होती. तसेच तिने या दरम्यान विविध ब्रॅण्डच्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्येही देखील काम केले. तिचा मुलगा तैमूर काही महिन्यांचा झाल्यावर लगेचच तिने पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली.
‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’ या कार्यक्रमात दोन पुरुष परीक्षक असल्याने या कार्यक्रमाला ग्लॅमर देण्यासाठी आता निर्माते एका महिला परीक्षकाच्या शोधात आहेत. आता कोणती अभिनेत्री ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’मध्ये परीक्षकाच्या खुर्चीत बसते हे आपल्याला लवकरच कळेल. 

Also Read : दीपिकानंतर करिना कपूरनेही केले स्मोकी लूकमध्ये फोटोशूट, पहा तिच्या अदा!
Web Title: For this reason, Kareena Kapoor refused to give to India's Next Superstar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.