For this reason, an electric jamwala gave a visit to Khichdi set | ​या कारणामुळे विद्युत जामवालने दिली खिचडीच्या सेटला भेट

स्टार प्लसवरील कॉमेडी शो खिचडी हा टीव्हीवरील सर्वांत मनोरंजक शोपैकी एक आहे. या शोमधील विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. नुकताच बॉलीवूडमधील नवीन युगातील ॲक्शन हिरो विद्युत जामवाल खिचडीच्या सेटवर दिसून आला. तो जवळच्याच सेटवर चित्रीकरण करत होता आणि या शोमधील कलाकारांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत चहा पिण्यासाठी तो सेटवर आला.
विद्युत त्याच्या आगामी चित्रपटासाठी जवळच्याच सेटवर चित्रीकरण करत होता. तो खिचडी या मालिकेच्या निर्मात्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे तो सेटवर आला आणि त्याने सर्वांशी बातचीत केली. सगळ्यांना त्याला भेटून खूप छान वाटले. याविषयी या मालिकेचे निर्माते आतिश कपाडिया सांगतात, “विद्युतच्या भेटीमुळे आम्हाला खूपच छान वाटले. विद्युत वेगन असल्यामुळे त्याने आयुष्यात कधी चहा प्यायला नव्हता. पण इथे तो चहाला नाही म्हणूच शकला नाही. तो एक मेहनती आणि विनम्र आहे. आम्ही त्याला त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देतो.”
खिचडी या मालिकेतील हॅलो हाऊ आर खाना खाके जाना हा... हा सुप्रिया पाठकचा संवाद चांगलाच गाजला होता. तसेच प्रफुल्लचे हंसाला इंग्रजी भाषेचा हिंदीत अर्थ समजावणे हे प्रेक्षकांना चांगलेच रुचले होते. खिचडी ही मालिका संपून अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेतील हंसा, प्रफुल्ल, जयश्री, बाऊजी, राजू, मेलिसा, चक्की, जॅकी, भावेश कुमार या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. खिचडी या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेवर खिचडी नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. आता प्रेक्षकांची खिचडी ही आवडती मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस आली आहे.
खिचडी या मालिकेत आपल्याला पारेख कुटुंबात घडत असलेली धमाल मस्ती पाहायला मिळाली होती. या कुटुंबातील हंसा आणि प्रफुल्ल यांची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. खिचडीचा नवा सिझन नुकताच सुरू झाला असून या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

Also Read : ​'खिचडी' मालिकेच्या थीमवर असणार या ठिकाणी हॉटेल
Web Title: For this reason, an electric jamwala gave a visit to Khichdi set
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.