For this reason, Azad Kale was angry with Big Boss resident team | या कारणामुळे आस्ताद काळे नाराज झाला बिग बॉसमधील रहिवाशी संघावर

बिग बॉस घरातील नॉमिनेट सदस्यांसाठी प्रार्थना यज्ञ या कार्याची घोषणा बिग बॉसने केली होती, नॉमिनेट सदस्यांना सदइच्छा देण्यासाठी हा यज्ञ आयोजित केला. हा टास्क रात्रभर चालला. आस्ताद काळेने हा टास्क उत्तमरीत्या पार पाडून बाजी मारली, त्याच्या बरोबर पुष्कर जोग, भूषण कडू याने देखील चांगल्या प्रकारे हा टास्क पार पाडला. टास्क रात्रभर चालल्यामुळे जे सदस्य रात्रभर यज्ञ कुंडाच्या जवळ बसले होते, त्यांना पूर्ण दिवस झोप मिळालेली नाही. त्यामुळे त्यांची चिडचिड होणे अगदीच साहाजिकच होते. आस्ताद काळे, भूषण कडू जवळपास संपूर्ण दिवस झोपले नव्हते, त्यांच्यासोबत पुष्कर देखील जागत होता. हा पहिला टीम टास्क असल्याकारणाने तो यशस्वीरीत्या पूर्ण करणे महत्त्वाचे होते. या टीम टास्क दरम्यान आस्ताद काळे संपूर्ण रहिवाशी संघावर प्रचंड नाराज असल्याचे दिसून आले. या टास्कच्या संदर्भात झालेल्या चर्चेमध्ये आस्ताद काळेने केलेल्या आरोपामुळे मेघाला खूपच वाईट वाटले आणि तिला रडू कोसळले. कारण आस्तादचे म्हणणे होते की, मेघाने आम्हाला प्रोत्साहन न देता ती निघून गेली. आस्तादने मेघावर नव्हे तर संपूर्ण टीम वर आपली नाराजी व्यक्त केली.
आस्तादचे एकच म्हणणे होते, आपण या मराठी बिग बॉसच्या घरामध्ये सगळे एका कुटुंबासारखे राहाणार आहोत. पण, जेव्हा घरामधील काही सदस्य रात्रभर फक्त चहा पिऊन जागले आणि पहिला टीम टास्क पूर्ण केला. पण सकाळी उठल्यानंतर जेव्हा सगळे उठले, तेव्हा आम्ही कसे आहेत हे विचारण्याची देखील कोणी तसदी देखील घेतली नाही. त्यामुळे मेघा बरोबर संपूर्ण टीमवर आस्तादाने नाराजी व्यक्त केली.
तर दुसरीकडे ऋतुजा, उषा आणि विनिता या तिघांमध्ये सकाळी सकाळी नॉमिनेशवर रंगलेली चर्चा बघायला मिळाली. उषा नाडकर्णींना कोणी कोणी नॉमिनेट केले आहे हे त्यांना सांगण्यात आले.अनिल थत्ते यांनी स्वत:ला बिग बॉसच्या घरातील नारदमुनी म्हटले. कारण त्यांना प्रत्येकाच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडते. तसेच त्यांनी आरती मनाने चांगली असल्याचे तेचं मेघाने आयुष्यामध्ये खूप काही सहन केल्याचे बिग बॉसला सांगितले.

Also Read : बिग बॉस मराठीतील या स्पर्धकाला मिळते सगळ्यात जास्त मानधन

 

Web Title: For this reason, Azad Kale was angry with Big Boss resident team
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.