Ravi Dubey is the most stylish person because of 'this' person! | 'या' व्यक्तिमुळेच रवी दुबे ठरतोय मोस्ट स्टाइलिश!
'या' व्यक्तिमुळेच रवी दुबे ठरतोय मोस्ट स्टाइलिश!
मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा फक्त अभिनेत्रींबाबत ऐकायला मिळायच्या.मात्र आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब आता अभिनेत्यांच्याही लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत. हिंदी अभिनेत्यांमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला आहे. असं असलं तरी काही अभिनेते मात्र त्याच त्या स्टाइल स्टेटमेंट फॉलो करताना दिसतात.म्हणून आता कलाकारांच्या पत्नीच ब-याचवेळा पुढाकार घेत स्टायलिश लूक कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील असतात.असेच काहीसे घडले आहे 'जमाई राजा' या मालिकेतून लोकप्रिय बनलेला अभिनेता रवी दुबेबरोबर.रवी दुबेच्या ड्रेसिंग,हेअर स्टाइल अशा अनेक गोष्टी रवी दुबेची पत्नी सरगुनच याकडे बारकाईने लक्ष देते.रवी सध्या नवीन शो सबसे स्मार्ट कौन?चे सूत्रसंचालन करत असून आम्ही असं ऐकलंय की त्याची पत्नी सरगु मेहताने त्याच्या ड्रेसिंग स्टाइलवर मेहनत घेतली आहे.

रवी दुबे आणि सरगुन हे नेहमीच एकमेकांवरील प्रेम सोशल मीडियावर आपले फोटो टाकून व्यक्त करत असतात.रवीने अनेकदा सांगितले आहे की त्याला त्याच्या पत्नीचा अतिशय अभिमान आहे आणि त्या दोघांमध्ये ती नक्कीच अधिक स्मार्ट आहे.तिच्यासोबत काम करण्याचीही त्याला इच्छा असून एखाद्या चांगल्या कथानकाच्या प्रतीक्षेत ते आहेत.ह्या शोमधील लूक्स आणि पोशाखांसाठी रवीचे पुष्कळ कौतुक होत असून त्याचे पूर्ण श्रेय तो त्याची पत्नी सरगुनलाच देतो.


रवी दुबे आणि सरगुन मेहता यांची लव्ह स्टोरी 'नच बलिए' सिझन 5मध्ये रसिकांना पाहायला मिळाली. मुळात रवी दुबे सुरभीला पहिल्यांदा दिल्लीत एका कार्यक्रमात भेटला होता.तिला पाहताच तो सरगुनच्या प्रेमात पडल्याचे त्याने सांगितले होते.एकाच क्षेत्रात काम करत असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.मुळात रवी दुबे आणि सरगुन यांच्या सुरू असणा-या प्रेमप्रमकरणाची माहिती होती.मात्र उघडपणे दोघेही कधी आपल्या प्रेमाविषयी बोलले नव्हते. 'नच बलिये'चा सेट या गोष्टीसाठी अपवाद ठरला आणि याच शोमध्ये त्याने सा-यांसमोर सरगुनला रोमँटीक अंदाजात प्रपोज केले होते.जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुली देणारी दोघांची पहिलीच वेळ होती. 
Web Title: Ravi Dubey is the most stylish person because of 'this' person!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.