Raveena Tandon will be touring the biggest event of the film | ​सबसे बडा कलाकारच्या फायनलला रवीना टंडन थिरकणार टीप टीप बरसा पानीवर

सबसे बडा कलाकार या कार्यक्रमात लहान मुले आपल्यातली अभिनय कला सादर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर केले जात आहेत. आता हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला असून या कार्यक्रमाचा फिनाले आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात रवीना टंडन, अर्शद वारसी आणि बोमन इराणी परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. 
अंतिम सोहळ्यात सगळे स्पर्धक एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स सादर करणार आहेत पण त्याचसोबत या कार्यक्रमातील परीक्षकदेखील एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 
रवीना टंडनचे मोहरा या चित्रपटातील टीप टीप बरसा पाणी हे गाणे लोकांना प्रचंड आवडते. आज या चित्रपटाला अनेक वर्षं झाली असली तरी हे गाणे रसिकांचे अतिशय आवडते आहे. या गाण्यात रवीना अप्रतिम दिसली होती. त्याचसोबत तिने अतिशय सुंदर नृत्य देखील सादर केले होते. हेच नृत्य ती सबसे बडा कलाकारच्या फायनलला सादर केले. हे नृत्य सादर करताना रवीना आज इतक्या वर्षांनी देखील तितकीच सुंदर दिसत होती. फायनलच्या खास भागासाठी रणबीर कपूरने उपस्थिती लावली होती. रवीनाचे नृत्य त्याला प्रचंड आवडले. त्यानेदेखील मंचावर जाऊन तिला साथ दिली. 
रवीनाचे नृत्य पाहाताना रणबीर त्याचे स्टारडम विसरून रवीनाचा केवळ फॅन बनला होता. तो रवीनाचे नृत्य सुरू असताना तिला फ्लाईंग किस देत होता. खरे तर तो रवीनाचा खूप मोठा चाहता आहे. रवीनासोबत नृत्य करायला मिळाल्यामुळे तो खूपच खूश झाला होता. 

Also Read : सबसे बडा कलाकारमध्ये जॉनी लिव्हर आणि मुलगी जॅमी लिव्हर यांची जुगलबंदी

Web Title: Raveena Tandon will be touring the biggest event of the film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.