प्राजक्ता वाडियेने रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या सिझनमध्ये देखील केले होते काम, साकारली होती ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:07 PM2019-04-19T17:07:43+5:302019-04-19T17:08:52+5:30

रात्रीस खेळ चाले 2 प्रमाणेच सरिताची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता वाडियेने या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्येच म्हणजेच रात्रीस खेळ चाले या मालिकेत देखील काम केले होते

ratris khel chale 2 fame prajakta wadaye was also part of ratris khel chale | प्राजक्ता वाडियेने रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या सिझनमध्ये देखील केले होते काम, साकारली होती ही भूमिका

प्राजक्ता वाडियेने रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या सिझनमध्ये देखील केले होते काम, साकारली होती ही भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देरात्रीस खेळ चाले या मालिकेत मी महिला पोलिस कॉन्स्टेबलची भूमिका साकारली होती. ही भूमिका खूपच छोटी होती. याचप्रकारे मी गर्ल्स हॉस्टेल, 100 डेज या मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या होत्या.

रात्रीस खेळ चाले ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू, सरिता या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच रात्रीस खेळ चाले 2 प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला. रात्रीस खेळ चाले प्रमाणेच ही मालिका देखील एक गुढ मालिका आहे. या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखांना चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे.

रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत नुकतेच दत्ताचे लग्न झालेले आपल्याला पाहायला मिळाले. सरिता ही अतिशय गरीब कुटुंबातील असून अण्णांनी आपल्या स्वार्थासाठी तिचे आणि दत्ताचे लग्न करून दिले आहे. या मालिकेत सरिता ही भूमिका प्राजक्ता वाडिये ही अभिनेत्री साकारत आहे. या मालिकेमुळे सध्या तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. रात्रीस खेळ चाले 2 प्रमाणेच तिने या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्येच म्हणजेच रात्रीस खेळ चाले या मालिकेत देखील काम केले होते. तिनेच ही गोष्ट टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे.

तिने मुलाखतीच्या दरम्यान सांगितले की, रात्रीस खेळ चाले या मालिकेत मी महिला पोलिस कॉन्स्टेबलची भूमिका साकारली होती. ही भूमिका खूपच छोटी होती. याचप्रकारे मी गर्ल्स हॉस्टेल, 100 डेज या मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेतील सविता या भूमिकेसाठी मला ज्यावेळी फोन आला. तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला होता. मला मालवणी ही भाषा खूपच चांगल्याप्रकारे बोलता येते. त्यामुळे ही भूमिका साकारताना भाषेची अडसर आली नाहीये. या मालिकेत मी नेहमीच साड्यांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते. पण मला खऱ्या आयुष्यात भारतीय पेहरावासोबतच मॉडर्न कपडे परिधान करायला देखील आवडतात.

Web Title: ratris khel chale 2 fame prajakta wadaye was also part of ratris khel chale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.