Ranveer Singh breaks down on Super Dancer Chapter 3 | रणवीर सिंग या कारणामुळे झाला भावूक
रणवीर सिंग या कारणामुळे झाला भावूक

ठळक मुद्देरणवीर व आलिया स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस पाहून झाले थक्क

अभिनेता रणवीर सिंगला नेहमी आनंदी आणि मस्तीच्या मूडमध्ये पाहिलेले आहे. त्याच्यात ऊर्जा ठासून भरलेली आहे आणि त्याचे मन सांगेल ती गोष्ट तो कोणत्याही संकोचाशिवाय करतो. सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सरच्या तिसऱ्या सीझनच्या येत्या भागात रणवीर सिंग आणि आलिया भट गली बॉय या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी उपस्थित राहिले होते.

रणवीर व आलिया हे दोन्ही कलाकार स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस पाहून थक्क झाले. परंतु गौरव आणि सुपर गुरु अमरदीप यांनी सादर केलेला एक अॅक्ट पाहून मात्र हा दंगेखोर अभिनेता रणवीर फारच भावूक झाला होता.

रणवीरचा जीवनप्रवास दर्शविणारा एक विशेष अॅक्ट त्या दोघांनी सादर केला होता. रणवीरला आज मिळालेले यश आणि कौतुक यांच्यापर्यंत पोहोचताना रणवीरने केलेल्या कठोर परिश्रमाचे चित्रण या अॅक्टमध्ये होते. ते पाहून रणवीरला आपल्या भावना लपवता आल्या नाहीत आणि तो एखाद्या निरागस बालकाप्रमाणे रडू लागला.


तो अॅक्ट संपल्यानंतर रणवीर म्हणाला, “मला कधीच असे वाटले नव्हते की मी एखाद्या डान्स शोमध्ये येईन आणि कोणी तरी आपल्या नृत्यामधून माझा जीवनप्रवास सादर करेल. काळ बदलला आहे. गेल्या वर्षी मी दोन उत्कृष्ट चित्रपट केले, विवाह केला. कधी तरी मला वाटते की हे सारे स्वप्न आहे. तुम्ही मला खरोखरच खूप भावनिक केलेत आणि मला माझे अश्रू अनावर झाले आहेत. हा अॅक्ट खूपच हृदयस्पर्शी होता.”
तो पुढे म्हणाला, “तुम्ही दाखवलेत त्याप्रमाणे मी देखील माझ्या वडिलांना ब्रो म्हणत असे. मी तुझ्या वडिलांचे आभार मानू इच्छितो कारण माझ्या वडिलांप्रमाणेच त्यांनीही तुला तुझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची सूट दिली आहे. देवाच्या कृपेने माझे आयुष्यात छान चालले आहे आणि माझी ही मनापासून इच्छा आहे की, देवाची तुझ्यावरही कृपादृष्टी असो.”


Web Title: Ranveer Singh breaks down on Super Dancer Chapter 3
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.