Rana and Barjat will fight against Vajrekessi | असा रंगणार राणा आणि दलजितचा वज्रकेसरी सामना

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत गेले काही दिवसांपासून ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहात आहेहत तो क्षण अखेर रसिकांना पाहता येणार आहे. अपघात झाल्यानंतर त्याने शेती आणि कुस्तीची आशाच सोडली होती.त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या राणाला अखेर या मातीनेच पुन्हा उठून उभं राहाण्याचं बळ दिलं.अंजली आणि गावकऱ्यांच्या साथीने राणा वज्रकेसरीसाठी पुन्हा उभा राहीलाय.येत्या २६ नोव्हेंबरला राणा आणि दलजितचा जंगी कुस्तीचा सामना रंगणार आहे. अंजलीला वाढदिवसाची भेट म्हणून वज्रकेसरीची गदा आणण्याचा राणाचा निश्चय आहे.पण दलजितला हाताशी घेऊन नंदिताने काही नवे डावपेच आखलेत.अटीतटीच्या या सामन्यात हिमालयाला सह्याद्रीचा मावळा भिडणार आहे.या महाएपिसोडसाठी १७ ते १९ नोव्हेंबरला कोल्हापूर जवळील इचलकरंजी इथे शूटिंग पार पडले. शूटिंगच्या पहिल्या दिवशी खऱ्या खुऱ्या पैलवानांच्या अनेक प्रदर्शनी कुस्तीही येथे झाल्या. राणा आणि दलजीतचा सामना पाहाण्यासाठी गावा गावातून लोकं आली असून या विशेष भागासाठी कुस्ती क्षेत्रात अढळ स्थान मिळवलेले काही दिग्गज मान्यवरही उपस्थित होते. दुखण्याला घाबरत नाही तो सच्चा पैलवान त्यामुळे राणादा दलजितला धुळ चारत मैदान मारणार यात शंकाच नाही.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा हा भाग झाला लीक, मालिकेची टीम आली टेन्शनमध्ये

तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या चित्रीकरणामुळे कोल्हापूरमधील गावात लोकांची प्रचंड ये जा होत असल्याने तेथील स्थानिक लोकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे आणि त्यामुळे त्यांनी या मालिकेच्या चित्रीकरणाला विरोध देखील केला होता. पण आता या मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरळीत सुरू झाले आहे. चित्रीकरण करण्यासाठी गावकऱ्यांनी काही अटी टीमवर लादल्या असून त्या टीमने पूर्ण देखील केल्या आहेत. चित्रीकरणाला गावकऱ्यांनी विरोध केल्यामुळे मालिकेच्या टीमला चांगलेच टेन्शन आले होते. पण आता त्यांचे टेन्शन थोडे कमी झाले आहे. मात्र आता एका वेगळ्याच गोष्टीला या मालिकेच्या टीमला तोंड द्यावे लागत आहे.या भागाच्या चित्रीकरणावेळी जमलेल्या लोकांनीच काही दृश्यांचे मोबाईलमध्ये काही व्हिडीओ शूट केले आणि आता ही दृश्य व्हॉटसअॅप आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमांवर व्हायरल झाली आहेत.
Web Title: Rana and Barjat will fight against Vajrekessi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.