Rama risks his life in Sony SAB’s Tenali Rama | 'तेनाली रामा'मध्ये रामा येणार अडचणीत, अशी करणार स्वत:ची सुटका
'तेनाली रामा'मध्ये रामा येणार अडचणीत, अशी करणार स्वत:ची सुटका

छोट्या पडद्यावरील 'तेनाली रामा' ही मालिका दिवसेंदिवस अधिक रंजक वळणावर येत असून मालिकतील सगळीच पात्रे रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे.पटकथा आणि आकर्षित करून घेणाऱ्या व्यक्तिरेखा यामुळे प्रेक्षकांच्‍या पसंतीची मालिका ठरली आहे. या मालिकेत तथाचार्य आणि रामा यांच्यातील वैरही कायम आहे. यातूनच रामाला (कृष्णा भारद्वाज) नामोहरण करण्यासाठी तथाचार्य (पंकज बेरी) शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.


आगामी भागात, तथाचार्य रामापुढे अनेक अडचणी निर्माण करणार आहे. जेणेकरून रामा कोणत्याही एका प्रश्नाकडे नीट लक्ष देऊ शकणार नाही. तशातच, योद्धांना आव्हान देणारा, त्यांना हरवून मारून टाकणारा शैतान सिंग दरबारात येतो आणि राजापुढे आव्हान ठेवतो. मात्र, आता राजाचे राज्यच दावणीवर लागेल, हे उमजून रामा यात पडतो आणि स्वत: आव्हान स्वीकारत आपले आयुष्य, कुटुंब व मालमत्ता दावणीवर लावतो. दरम्यान आपले दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी तथाचार्य दिवोदासच्या नेतृत्वाखाली राज्यातील बेरोजगार सुशिक्षित तरुणांना बंड करण्यास प्रवृत्त करतो. चक्रपाणीचे शिक्षण निरुपयोगी असल्याचा दावा दिवोदासच्या नेतृत्वाखालील तरुणांचा समुदाय करतो. मात्र, त्यांना चुकीचे ठरवण्याचा विडा रामा उचलतो.


तथाचार्याची भूमिका साकारणारे पंकज बेरी म्हणाले, "रामाला नामोहरण करण्यासाठी तथाचार्य सतत काही नवीन युक्त्या आणि कल्पना लढवत असतो. येणाऱ्या भागात रामापुढे अनेक आव्हाने असणार आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना हा भाग नक्की आवडेल. पडद्यावर आमच्यात शत्रुत्त्व असले तरी तेनाली रामाच्या संपूर्ण टीमसोबत चित्रीकरण करण्यात मजा येते. आमच्या प्रेक्षकांना असाच आनंद मिळत राहील, अशी आम्हाला आशा आहे." स्वत:ला शैतान सिंगपासून वाचवताना गुरु चक्रपाणी यांचे महत्त्व पटवून देण्याचा मार्ग रामाला सापडेल का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा आगामी भागात होणार आहे.
 


Web Title: Rama risks his life in Sony SAB’s Tenali Rama
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.