गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय, चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांच्या अभिनयावर आजही सारेच फिदा आहेत. त्यामुळेच की काय बॉलीवुड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे.आजही बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्री म्हणून रेखा यांची गणना होते.  
'रायझिंग स्टार 3' च्या आगामी भागात रेखा उपस्थित राहणार आहेत.

त्यांच्या येण्याने नक्कीच  मंचाला शोभा येणार हे मात्र नक्की. 'सलाम-ए-रेखा' असा या विशेष भाग असणार आहे. यावेळी बॉलीवूडमधील रेखाचा आकर्षक प्रवास साजरा केला जाणार आहे. जवळपास 180 सिनेमात काम केलेल्या रेखा यांना हा संपूर्ण एपिसोड समर्पित केला जाणार आहे. भानुरेखा गणेशन ते बॉलीवुड दिवा रेखा असा त्यांचा प्रवास पाहणे रसिकांसाठी नक्कीच एक मनोरंजनाची ट्रीट ठरणार आहे.  यावेळी रायझिंग स्टारचे स्पर्धक रेखा यांच्या गाजलेल्या गाण्यावर स्पर्धक धमाकेदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत. रेखा यांना स्पर्धकांचा परफॉर्मन्स पसंतीस पात्र ठरावा यासाठी स्पर्धकही खूप मेहनत घेत आहे.

रेखा येणार हे कळताच स्पर्धकांनी त्यांच्यासाठी खास सरप्राईज देखील प्लॅन केेले आहे. तसेच रेखासुद्धा रसिकांसाठी एक खास परफॉर्मन्स देणार आहेत. रेखा यांच्या सादरीकरणामुळे जुन्या आठवणी पुन्हा नव्यानं जिवंत होतील यांत काही शंकाच नाही. गेल्या काही वर्षांपासून रेखा यांनी सिनेमात काम केलेले नाही. त्यामुळे 'रायझिंग स्टार 3'च्या निमित्ताने पुन्हा एकदा रेखा यांचे दर्शन रसिकांना होणार हे मात्र नक्की.   


Web Title: Raksha's magic will be seen again on the small screen, Saalam - E- Rekha Special on Rising Star 3
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.