Rajesh Shringarpuri will return to Bigg Boss house ... Chemistry of silk and Rajesh to be seen again in the audience | ​राजेश शृंगारपुरे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये परतणार... प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार रेशम आणि राजेशमधील केमिस्ट्री

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून काल अनिल थत्ते यांना घराबाहेर जावे लागले. घराबाहेर पडल्यावर त्यांना एक विशेष अधिकार देण्यात आला, या अधिकाराद्वारे ते घरामधील एका सदस्याला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमधून वाचवू शकतील. अनिल थत्ते यांनी भूषण कडूला वाचवले असून आता घरामधील बाकीचे सदस्य कोणाला नॉमिनेट करणार? कोण घराबाहेर पडणार? हे बघणे रंजक असणार आहे. 
राजेश शृंगारपुरे गेली बरेच दिवस सिक्रेट रूम मध्ये एकटा राहात होता. परंतु काल त्याला अश्रू अनावर झाले आणि त्यांनी बिग बॉसला विनंती केली की, मला परत बिग बॉसच्या घरामध्ये जाऊ द्या. आज राजेश बिग बॉस मराठीच्या घरामध्ये परतणार असून त्याला पाहून रेशम, आस्ताद, सुशांत, जुई सगळ्यांच खूप आनंद झाल्याचे दिसून येणार आहे. रेशम आणि राजेश हे दोघीही मागील आठवड्यामध्ये डेंजर झोनमध्ये होते. रेशम टिपणीस घरामध्ये परतली. पण राजेश याला अज्ञातवासामध्ये ठेवण्यात आले होते. परंतु तो एलिमनेट झालेला असल्याचे घरातील इतर सदस्यांना वाटत होते. आज राजेशला बिग बॉस त्याचा अज्ञातवासाचा कालावधी संपला असे घोषित करून परत बिग बॉसच्या घरामध्ये पाठवणार आहेत. राजेशच्या येण्याने आता घरामध्ये तसेच सदस्यांमध्ये काय बदल बघायला मिळतील हे पाहाण्यासारखे असणार आहे. राजेश घरी परतल्यावर “मी फक्त तुझ्यासाठी या घरामध्ये आला” असे राजेशने रेशमला बोलून दाखवले आहे. बिग बॉस मराठीमधील रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्यात मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी असल्याचे प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाले होते. 
राजेश घरातून बाहेर पडल्याने रेशम एकटी पडली होती. त्यामुळे राजेशच्या कमबॅकने सगळ्यात जास्त आनंद तिलाच झाला आहे. राजेशच्या परत येण्याने त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही. 
बिग बॉसच्या घरात आज नॉमिनेशन प्रक्रिया सुरू होणार असून या नॉमिनेशनमध्ये भूषण कडू सेफ असून बाकीच्या सदस्यांपैकी कोण कोणाला नॉमिनेट करेल? हे प्रेक्षकांना आज पाहायला मिळणार आहे. 

Also Read : ​ही आहे राजेश शृंगारपुरेची पत्नी, बिग बॉस मराठीमध्ये रेशम टिपणीससोबत असलेल्या नात्यामुळे सध्या चर्चेत आहे राजेश
Web Title: Rajesh Shringarpuri will return to Bigg Boss house ... Chemistry of silk and Rajesh to be seen again in the audience
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.