Rajesh Shringarpura is married to a senior boss in Marathi with silk tips, Married, know about his family | ​बिग बॉस मराठीमध्ये रेशम टिपणीससोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आलेला राजेश शृंगारपुरे आहे विवाहित, जाणून घ्या त्याच्या कुटुंबियांविषयी

बिग बॉस मराठी मध्ये दोन स्पर्धकांमध्ये सध्या प्रेमाचा अंकुर फुटतो आहे. रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्यात मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी असल्याचे प्रेक्षकांना सध्या बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी एकमेकांना पसंत करत असल्याची कबुली देखील नुकतीच बिग बॉसच्या घरात दिली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का राजेशचे लग्न झाले असून त्याला दोन मुली देखील आहेत. राजेश हा गोरेगावमध्ये त्याच्या पत्नी आणि दोन मुलींसोबत गेल्या अनेक वर्षांपासून राहात आहे. त्याची पत्नी ही गृहिणी असून त्यांच्या लग्नाला १२-१३ वर्षं झाली आहेत तर दुसरीकडे रेशम ही घटस्फोटीत असून तिला दोन मुले आहे. रेशमचे लग्न छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता संजीव सेठ सोबत १९९३ला झाले होते. त्या दोघांमध्ये १२ वर्षांचे अंतर आहे. लग्न झाले त्यावेळी रेशम २० वर्षांची तर संजीव ३२ वर्षांचा होता. त्या दोघांनी २००४ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटानंतर त्यांची दोन्ही मुले संजीव सोबत राहातात. संजीवने रेशम सोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री लता सब्रवालसोबत लग्न केले. लता आणि संजीव हे अनेक वर्षांपासून रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत काम करत आहेत. ते दोघे या मालिकेत अक्षराच्या आई-वडिलांची भूमिका साकारत आहेत. त्या दोघांना एक मुलगी असून ती आता चार वर्षांची आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात रोज काही ना काही टास्क सुरू असतात. नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये रेशमने राजेशवर प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच बिग बॉसच्या घरात नुकताच चोर पोलिसचा खेळ रंगला होता. या खेळाच्या दरम्यान देखील रेशम टिपणीस राजेशला म्हणाली, आपण बिग बॉसच्या घरात दोघे काही विचित्र वागतोय असे मला तरी वाटत नाही, घरात कुणालाही आपल्या नात्याविषयी काय बोलायचे ते बोलू देत, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. रेशमने असे सांगताच राजेशने देखील लगेचच यावर उत्तर दिले. तो म्हणाला, मी देखील कुणाला घाबरत नाही. 
राजेशच्या या वागण्यावर त्याच्या पत्नीची काय प्रतिक्रिया असणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे. 

Also Read : बिग बॉस मराठीच्या घरात रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरेमध्ये फुलतेय प्रेम
Web Title: Rajesh Shringarpura is married to a senior boss in Marathi with silk tips, Married, know about his family
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.