Raja Rao's leg hurt during the reality show | रिअॅलिटी शो दरम्यान झाली राजकुमार रावच्या पायाला दुखापत

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव शूटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. हा अपघात राजकुमारसोबत एका रिअॅलिटी शोच्या शूटिंग दरम्यान झाला आहे. राजकुमार राव फराह खानसोबत लिप सिंग बैटल शोच्या सेटवर गेला होता. याठिकाणी हा अपघात झाला आहे. राजकुमार रावचा डावा पाय फ्रैक्चर झाला आहे. यामुळे तो सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. मुंबईतल्या यशराज स्टुडिओमध्ये रिअॅलिटी शोचे शूटिंग सुरु होते. डान्स करताना अचानक राजकुमारच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे राजकुमारवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. लिप सिंग बैटल या रिअॅलिटी शोमध्ये चिंता का चिता चिता गाण्यावर डान्स करत होता. या गाण्यावर डान्स करताना त्याला वरुन उडी मारायची होती. मात्र उडी मारताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला आहे. त्यामुळे त्याचा डावा पाय फ्रैक्चर झाला. यानंतर त्याला लगेचच कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टर ने राजकुमारला सध्या आराम करण्यास सांगितले आहे. ज्यामुळे त्याला काही दिवस हॉस्पिटलमध्ये आरामा करावा लागणार आहे. या गोष्टीची माहिती स्वत: राजकुमार रावने सोशल मीडियावर दिली. ज्या फोटोमध्ये त्याच्या पायाला दुखापत झालेली स्पष्ट दिसते आहे. या फोटोत त्याच्यासोबत फराह खानसुद्धा दिसते आहे. या फोटोसोबत राजकुमार रावने एक मेसज सुद्धा लिहिला आहे. राजकुमार लिहितो, माझ्या पायाला दुखापत झाली आहे. थँक्यू फराह खान तू दिलेल्या सपोर्टसाठी. कृति आणि तुझ्या टीमला कारण शो ची शूटिंग पूर्ण करु शकलो नाही.  

राजकुमार रावसोबत झालेल्या अपघातामुळे फराह खान आणि तिची टीम चिंतेत आणि दुखी दिसली. या अपघातामुळे राजकुमारने आपला आगामी चित्रपटाचे शूटिंग कॅन्सल केले आहे. डॉक्टरने त्याला काही दिवस बेज रेस्ट सांगितले आहे. राजकुमार लवकरच शादी में जरुर आना चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कृती खरबंदा दिसणार आहे. हा चित्रपट 10 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  राजकुमारच्या न्यूटन चित्रपटाला काही दिवसांपूर्वीच ऑस्कर नॉमिनेशन मिळाले आहे. 
Web Title: Raja Rao's leg hurt during the reality show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.