Radha's support will be the future of the relationship! | राधाच्या पाठिंब्याने सावरणार नात्याचं भविष्य !

कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याचश्या घटना घडल्या आहेत ज्यामुळे मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. प्रेम बऱ्याच दिवसांपासून खूप मोठ्या धर्मसंकटामध्ये होता कि, दीपिकाच्या पोटात वाढणार मुलं हे माझं आहे. पंरतु त्याचा हा गैरसमज राधाने दूर केला... आणि प्रेमला सांगितले कि, दीपिका ताई प्रेमला फसवत असून ते बाळ प्रेमचं नसून आदित्यच आहे. हे सत्य ऐकून प्रेमला आदित्यचा प्रचंड राग येतो. प्रेम घटस्फोटाची कागदपत्रे देखील फाडून देतो. याचा माधुरीला खूप आनंद होतो कि आता राधा या घराला सोडून कुठेही जाणार नाही. आदित्य आणि दीपिकाने सुरु केलेल्या नव्या कंपनीच्या उद्घाटनाच्या दिवशी दीपिका कळतं कि प्रेम राधाला घटस्फोट देणार नाही. दीपिकाला या सगळ्यामुळे खूप मोठा धक्का बसतो आणि त्यातच ती आपल्या मुलालं गमावून बसते. दीपिकाच्या आईला मात्र हे सहन होत नाही. माधुरी आणि राधाला ती Blackmail करण्यास सुरुवात कि, मी प्रेमला सत्य सांगेन कि तो माधुरीचा मुलगा नसून त्याला तुम्ही दत्तक घेतले आहे. प्रेमला हे सत्य राधा कसं सांगणार ? कसं प्रेमला यातून सांभाळणार ? प्रेम यामधून कसा बाहेर येणार आणि हे सत्य पचवणार ? राधा कश्याप्रकारे प्रेमचा संसार आणि व्यवसाय सावरणार ? या अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

हे सगळे घडत असताना आदित्यच्या वागण्यात झालेला बदल प्रेम आणि राधाला दिसून येत आहे. त्यामुळेच राधा प्रेमला त्याच्या व्यवसायात मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. राधाने प्रेमला मदत व्हावी यासाठी ऑफीसला जाण्यास देखील सुरुवात केली आहे. हे सगळे घडत असताना, राधाला माधुरीची देखील खूप चिंता वाटत आहे. माधुरीने राधाला तिला खूप भीती वाटत आहे कारण जेंव्हा प्रेमला हि गोष्ट कळेल कि, तो आमचा मुलगा नसून आम्ही त्याला दत्तक घेतले आहे तेंव्हा तो माझा आई म्हणून कधीच स्वीकार करणार नाही. राधा याबतीत पुढाकार घेऊन माधुरीला मदत करण्याचा निर्णय घेते. यामुळेच राधा प्रेमला सत्य सांगते जे ऐकून प्रेम पूर्णपणे खचून जातो. ईतक मोठं सत्य का माझ्यापासून लपवून ठेवले हे त्याला कळत नाही आणि तो घराबाहेर निघून जातो.
 
राधा कशी प्रेमला यामधून बाहेर काढेल ? कसा त्याचा व्यवसाय आणि संसार सांभाळेल ? कसं नात्यांच भविष्य सावरेल ? राधा आणि प्रेमचे नातं कुठल्या वळणावर येईल ? हे बघणे रंजक असणार आहे. 
Web Title: Radha's support will be the future of the relationship!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.