Pushkar Jogala injured in Bigg Boss house | बिग बॉसच्या घरामध्ये पुष्कर जोगला झाली दुखापत

बिग बॉसच्या घरामध्ये राहाणाऱ्या स्पर्धकांचा बाहेरच्या जगाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो. या घरामध्ये मोबाईल, टेलिव्हिजन या सगळ्या माध्यांपासून दूर असतात. कारण त्यांना या गोष्टी घरामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई असते. त्यामुळे पूर्ण दिवस एका घरामध्ये काय करायचे? हा प्रश्न कोणालाही पडतो. बिग बॉस घरातील प्रेक्षकांचे लाडके १५ स्पर्धक कलाकार सध्या कधी गप्पा गोष्टी मारून वेळ घालवत आहेत तर कधी अंताक्षरी खेळत आहेत, कधी धम्माल किस्से सांगून एकमेकांची करमणूक करत आहेत. कधी डान्स करत आहेत तर कधी आपले अनुभव एकमेकांना सांगत वेळ घालवत आहेत.
बिग बॉसच्या घरामध्ये वेळ घालविण्यासाठी स्पर्धक घरामध्ये कांदा फोडीचा खेळ खेळत असल्याचे देखील नुकतेच दिसले. या खेळामध्ये घरामधील अनेक सदस्यांनी भाग घेतला होता. पण सई लोकूर हा खेळ खेळली नाही. उषा नाडकर्णी आणि अनिल थत्ते यांसारख्या वयस्कर स्पर्धकांनी देखील या खेळाचा आनंद लुटला. पण हा खेळ खेळत असताना पुष्कर जोगला नुकतीच दुखापत झाली. पण घरातल्यांनी त्याची चांगलीच काळजी घेतली.
पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पुष्कर एक अभिनेता म्हणून सगळ्यांनाच परिचित आहे. पण तो एक माणूस म्हणून कसा आहे हे प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे अनुभवायला मिळणार आहे. घरामध्ये जाऊन स्पर्धकांना एकच दिवस झाला आहे. पण स्पर्धकांनी एकमेकांना वेगवेगळी नावे ठेवायला देखील सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्या दिवसापासूनच खटके उडायला सुरुवात झाली आहे. एकीकडे अनिल थत्ते आणि उषा नाडकर्णी या दोघांमध्ये बरेच मतभेद आहेत, या दोघांचे एकमेकांशी पटत नसून त्यांच्यामध्ये आता खटके उडत आहेत. अनिल थत्ते यांनी केलेल्या आत्महत्याच्या वक्तव्यामुळे घरामध्ये चर्चेला उधाण आले आहे. अनिल थत्ते घरामध्ये बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा करताना दिसतात. मग ते त्यांचे कपडे असो वा टिकली असो वा त्यांची प्रकृती असो वा त्यांचे विचार असो. दुसरीकडे रेशम आणि आस्ताद काळे या दोघांना उषा नाडकर्णी यांच्या प्रकृतीविषयी बरीच काळजी असल्याचे त्यांनी सांगितले. 

Also Read : जाणून घ्या कसा गेला बिग बॉस मराठीचा दुसरा दिवस

Web Title: Pushkar Jogala injured in Bigg Boss house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.