The promise that Salman Khan gave to the contestant on the sets of the 10th Dum | ​सलमान खानने दस का दम या कार्यक्रमाच्या सेटवर स्पर्धकाला दिले हे वचन

दस का दम या कार्यक्रमाचे आजवरचे अनेक सिझन प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. या कार्यक्रमाचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील सलमान खान करत आहे. सलमानच्या दस का दम या कार्यक्रमाच्या या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या कार्यक्रमाचा पहिलाच भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या पहिल्या भागाची चांगलीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली होती. या पहिल्या भागात एका स्पर्धकानेच सलमानवर गुगली टाकल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. 
दस का दम या कार्यक्रमात स्पर्धक पैसे कमवण्याच्या हेतूने येतात. या पैशातून आपल्या कुटुंबियांचे भले होईल, आर्थिक गरजा पूर्ण होतील असे सगळ्यांना वाटत असते. पण काही जण चुकीच्या उत्तरांमुळे ते चांगली रक्कम कमवू शकत नाहीत. अशाच एका स्पर्धकासाठी सलमान देवदूत बनला. सलमान नेहमीच सगळ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असतो. त्याच्या बिइंग ह्युमन या संस्थेतेर्फे अनेक गरजूंना मदत केली जाते हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. या कार्यक्रमात नुकतीच पिंकी शाह म्हणून एक स्पर्धक आली होती. ही स्पर्धक मुळची कोलकाताची होती. या कार्यक्रमात भाग घेण्याची पिंकीला संधी मिळाली असली तरी या कार्यक्रमात तिला केवळ २० हजार रुपयेच जिंकता आहे. इतकी कमी रक्कम जिंकल्यानंतर पिंकी सेटवरच जोरजोरात रडायला लागली होती. पिंकी एवढी का रडत आहे, तिला काय झाले हे सेटवर कोणालाच कळत नव्हते. त्यामुळे पिंकीच्या रडण्यामागचे कारण सलमानने तिला विचारले. त्यावर तिने सलमानला जे काही सांगितले, ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पिंकीने सांगितले, तिची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असून ती एका खाजगी कंपनीत काम करते. तिचा पगार हा खूपच कमी असल्याने त्यामध्ये घरखर्च भागवणे तिला कठीण जाते. तिच्या मुलीला ती चांगले शिक्षण देऊ शकेन का हा प्रश्न तिला नेहमीच सतावत असतो. तिचे हे बोलणे ऐकल्यावर यापुढे तुमच्या मुलीचा शिक्षणाचा संपूर्ण मी करेन असे सलमानने तिला सांगितले. 
सलमानने मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्यानंतर पिंकूच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडले आणि तिने सलमानचे आभार मानले. 

Also Read : ​सलमान खानने त्याच्या लहानपणीचा हा अनुभव केला शेअर... लहानपणी प्रवास करताना सलमानची व्हायची अशी अवस्था
Web Title: The promise that Salman Khan gave to the contestant on the sets of the 10th Dum
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.