The program will be seen in the twin girls of Karanveer Bohra | ​करणवीर बोहराच्या जुळ्या मुली दिसणार या कार्यक्रमात

करणवीर बोहरापेक्षा सध्या त्याच्या जुळ्या मुलींचीच जास्त चर्चा आहे. करणवीर त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्यांचे फोटो नेहमीच पोस्ट करत असतो आणि त्याच्या फोटोंना त्याचे फॅन्स लाइक करत असतात. आता त्याच्या मुली प्रेक्षकांना एका कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत.
करणवीर बोहराच्या मुली केवळ आठ महिन्यांच्या असून त्या आता छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. करणवीर सध्या इंडियाज बेस्ट जुडवा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. त्याच्या बेला आणि वायना या मुली या कार्यक्रमात झळकणार आहेत. डिसेंबर २०१६ ला करणच्या पत्नीने या गोंडस मुलींना जन्म दिला. करणला जुळ्या मुली झाल्यानंतर त्याला लगेचच या कार्यक्रमाविषयी विचारण्यात आले होते. त्यामुळे या दोघी माझ्यासाठी खूप लकी आहेत असे तो सांगतो. 
इंडियाज बेस्ट जुडवा या कार्यक्रमाच्या स्वातंत्र्यदिनाच्या स्पेशल एपिसोडमध्ये करणसोबत त्याच्या मुली दिसणार आहेत. याविषयी करण सांगतो, माझ्या मुली कार्यक्रमात येणार असल्याने माझ्या चाहत्यांना नक्कीच आनंद होईल. पण त्याचसोबत माझ्या मुलींसाठी देखील हा खास दिवस होता. चित्रीकरणाच्या दिवशी त्या दोघीही खूपच खूश होत्या. त्या दोघींनी पहिल्यांदाच इतक्या जुळ्यांना एकत्र पाहिले. त्या सगळ्या जुळ्यांकडे निरखून पाहात होत्या. त्या खूपच लहान असल्याने खरे तर त्यांना काहीच कळत नव्हते. पण तरीही त्या सगळ्यांना पाहात होत्या. थोड्या वेळानंतर त्या सगळ्यांमध्ये मस्त मिक्स झाल्या होत्या आणि सगळ्यांसोबत खेळायला देखील लागल्या होत्या. बेल्ला तर सतत माझा माईक ओढण्याचा प्रयत्न करत होती. तिला काहीतरी बोलायचे होते असेच मला सतत वाटत होते. चित्रीकरणाला माझी पत्नी तिजय सिद्धू देखील आली होती.  

Also Read : टीव्ही कलाकार करणवीर बोहराने मुलींसह केले फोटोशूट
Web Title: The program will be seen in the twin girls of Karanveer Bohra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.