Priya Marathe became Godavari in Marathi and she shared a low-key, shared photo with double pleasure | ‘गोदावरी’ बनून प्रिया मराठे मराठीत करणार कमबॅक,फोटो शेअर करुन व्यक्त केला दुहेरी आनंद

कोणत्याही कलाकाराला कायमच वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिका साकारायला आवडतं.त्यामुळे कलाकार मंडळी कायमच अशा भूमिकांना पसंती देत असतात.त्यातच एखादी पौराणिक मालिका असेल तर त्यात भूमिका साकारण्याची संधी कुणीच सोडणार नाही.अशीच काहीशी संधी अभिनेत्री प्रिया मराठे हिला मिळाली आहे.ही संधी प्रियासाठी तितकीच खास आणि स्पेशल आहे.नुकतंच प्रिया मराठेने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.या फोटोमध्ये प्रियाचा खास अंदाज आणि लूक पाहायला मिळतो आहे. प्रियाचा हा मराठमोळा अंदाज लक्षवेधी आहे.कपाळावर कुकुंवाचा टिळा,नथ आणि मराठमोळ्या अंदाजातील साडी यांत प्रियाचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या एका मालिकेसाठी तिचा हा खास लूक आहे.छोट्या पडद्यावर 'स्वराज्य रक्षक संभाजी' ही मालिका गाजत आहे.या मालिकेत प्रिया 'गोदावरी' या भूमिकेत झळकणार आहे.या मालिकेतील ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे प्रिया खूप खुश आहे. तिच्या आनंदाचं दुहेरी कारण आहे.एक म्हणजे इतक्या भव्य मालिकेत भूमिका साकारण्याची संधी मिळणं आणि दुसरं म्हणजे ज्या चॅनेलपासून करिअरची सुरुवात केली त्याच चॅनेलवर कमबॅक करण्याची मिळालेली संधी.यामुळे प्रियाच्या आनंदाला पारावर उरलेला नाही.त्यामुळे हा विशेष क्षण तिने फोटोरुपात आपल्या फॅन्ससह सोशल मीडियावर शेअर केला आहे.प्रियाने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री मारली.यानंतर 'चार दिवस सासूचे' या मालिकेत तिने काम केलं.'तू तिथे मी' या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली. याशिवाय 'कसम से' या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली.मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली.'बडे अच्छे लगते है','कॉमेडी सर्कस'मध्येही प्रिया झळकली.गेल्या वर्षी तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही एंट्री मारली.या मालिकेतही तिची निगेटिव्ह भूमिका होती.इतके वर्ष विविध मालिकांमध्ये काम केलेली प्रिया पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहे.ज्या ठिकाणी तिने करिअरची सुरुवात केली त्याच चॅनेलवरील एका पौराणिक मालिकेतून कमबॅक होत असल्याने प्रियाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 
Also Read:म्हणून निगेटिव्ह भूमिका भावतात – प्रिया मराठे
Web Title: Priya Marathe became Godavari in Marathi and she shared a low-key, shared photo with double pleasure
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.