Prakash Ramchandani's entry to 'Kalbhairav ​​secrets' will be an entry | ‘काळभैरव रहस्य’मालिकेत प्रकाश रामचंदानीची होणार एंट्री

आपली भूमिका वास्तववादी वाटण्यासाठी अभिनेते आजकाल विशेष परिश्रम घेताना दिसतात. छोट्या पडद्यावरील ‘काळभैरव रहस्य’ या मालिकेत आता प्रकाश रामचंदानी या अभिनेत्याचा प्रवेश होणार आहे. तो या मालिकेत यशपाल या कपटी माणसाची भूमिका रंगविणार आहे. या मालिकेतील भूमिकेविषयी प्रकाश रामचंदानीने सांगितले की, “या नव्या मालिकेत मला भूमिका साकारायची संधी मिळाल्याबद्दल मी खूपच आनंदित असून एक वेगळ्याच प्रकारची एक्सायटमेंट जाणवत असल्याचे त्याने सांगितले.मला आव्हानं स्वीकारायला आवडतात,म्हणूनच मी ही भूमिका स्वीकारली आहे. या मालिकेच्या कथानकाला अनेक नवी वळणे मिळत असून माझी भूमिका मला फार वेगळी असणार आहे.मी जी भूमिका रंगवीत आहे, ती प्रेक्षकांना पसंत पडेल, अशी आशा आहे. माझ्याबरोबर भूमिका रंगविणारे कलाकार आणि मालिकेची संपूर्ण टीम  मदत करण्यास नेहमीच उत्सुक असतात. मालिकेचे दिग्दर्शक धर्मेशजी यांच्याशी माझी जुनी मैत्री आहे.त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळत असल्याचा मला आनंद असल्याचे त्याने म्हटले आहे.”

Also Read:भगवान कालभैरवची प्रार्थना करून राहुल शर्माने साजरा केला आपला वाढदिवस

मालिकेतील कथा आणि कलाकारांचा भूमिकेमुळे या मालिकेला रसिकांची पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.मालिकेत आता आणखीन एका अभिनेत्री एंट्री होणार आहे. आपल्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांची पसंती मिळविलेली अभिनेत्री सुनीला करंबेळकर या मालिकेत शक्तीदेवीची भूमिकेत झळकणार आहे. सुनीलाला यासंदर्भात  विचारले असता तिने सांगितले की, “या मालिकेतल्या शक्तीदेवीची भूमिका साकारणार म्हणजे एक वेगळा अनुभव मिळवणे असे मी मानते.शक्तीदेवी  गेली 14 वर्षं तुरुंगात आहे. कोणताही त्रागा न करता किंवा न संताप  न करता  एखाद्या समस्येवर तोडगा काढण्याचं कसब तिच्याकडेच असतं. ती अतिशय चलाख आणि झटपट विचार करणारी असते.ज्यात तिचा फायदा असतो, अशा गोष्टी ती कसंही करून साध्य करतेच. ही एक शक्तिशाली व्यक्तिरेखा असून 'काळभैरव रहस्य' मालिकेत मला भूमिका साकारावयास मिळाली,याचा मला आनंद होत आहे. मालिकेचे निर्माते धर्मेश शहा यांच्याबरोबरची माझी ही तिसरी मालिका आहे.ती सांगते, “या मालिकेतील संवादही ‘सबकी खबर रखें है शक्तीदेवी’ मनापासून आवडले आहेत. आणि आगामी काळात हेच संवाद रसिकांच्या पसंतीस उतरतील अनेक एव वेगळी  ओळख निर्माण करेन अशी आशा तिला वाटते. मालिकेत राहुल शर्मा आणि छावी पांडे हे या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत.
Web Title: Prakash Ramchandani's entry to 'Kalbhairav ​​secrets' will be an entry
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.