Prajakta Gaikwad loves Navratra for this reason | 'या' कारणामुळे प्राजक्ता गायकवाडला आवडते नवरात्र
'या' कारणामुळे प्राजक्ता गायकवाडला आवडते नवरात्र

ठळक मुद्दे माझ्या घरी घटस्थापना होत असल्यामुळे नातेवाईक घरी येतात

नवरात्रौत्सवाला सगळीकडे मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. प्राजक्ता म्हणजेच संभाजी मालिकेतील येसूबाई नवरात्र साजरी करण्याबद्दल म्हणाली, "डान्स हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि नवरात्र म्हटल की खूप धमाल असते. माझे आई बाबा उपवास करतात त्यामुळे आमची खाण्यापिण्याची चंगळ असते. रोज काहीतरी नवनवीन पदार्थ खायला मिळतात. माझ्या घरी घटस्थापना होत असल्यामुळे नातेवाईक घरी येतात. त्यांची भेट होते. घरात धार्मिक वातावरण असतं आणि धार्मिक चर्चा होतात. मी आधी माझ्या मित्र-मैत्रिणीसोबत गरबा खेळायला जात असत, पण आता शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे मला जात येत नाही पण शूटिंगमधून वेळ काढून एकदिवस तरी मी घरी देवीच्या दर्शनाला जाते तसे काही जागृत देवींच्या दर्शनाला देखील जाते.

 अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या प्राजक्ताला ‘नांदा सौख्य भरे’च्या माध्यमातून मराठी इंडस्ट्रीत ब्रेक मिळाला. सध्या प्राजक्ताना ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसूबार्इंची व्यक्तिरेखा समर्थपणे साकारताना दिसत आहे. या मालिकेसाठी तिने घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिषण घेतले आहे. प्राजक्ता शालेय, आंतरशालेय एकांकिका, नाटकांमध्ये सहभाग घ्यायची. तिला बॉलिवूड, हिप-हॉप आणि कथ्थक हे सर्व डान्सचे प्रकार येतात. प्राजक्ताला दाक्षिणात्य चित्रपट खूप आवडतात. अशा एखाद्या चित्रपटाची आॅफर आल्यास तिला करायला आवडेल. दिग्गज कलाकारासोबत चित्रपटात काम करायची ही प्राजक्ताची इच्छा आहे. 


 


Web Title: Prajakta Gaikwad loves Navratra for this reason
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.