ठळक मुद्देआयपीएल संपल्यानंतर ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका प्रेक्षकांना स्टार प्लस वाहिनीवर पाहायला मिळणार असून या मालिकेबाबत सध्या प्रोडक्शन हाऊस आणि वाहिनी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे.

संजीवनी ही मालिका 2002 साली प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेत गुरूदीप कोहली, मिहीर मिश्रा, संजीत बेदी, मोहनिश बहल, इरावती हर्षे, शिल्पा शिंदे, अर्जुन पुंज यांच्या मुख्य भूमिका होत्या. ही मालिका एका रुग्णालयातील डॉक्टरांच्या आयुष्यावर बेतलेली होती. या डॉक्टरांचे आपापसातले मतभेद, त्यांच्या प्रेमकथा या मालिकेत पाहायला मिळाल्या होत्या. ही मालिका चांगलीच गाजली होती. 

संजीवनी या मालिकेच्या यशानंतर याच कथेवर आधारित असेलली दिल मिल गये ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या मालिकेत करण सिंग ग्रोव्हर, शिल्पा आनंद, सुकृती कंडपाल, जेनिफर विंगेट आणि मोहनिश बहल मुख्य भूमिकेत होते. ही मालिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता पुन्हा एकदा डॉक्टरांच्या आयुष्यावर आधारित संजीवनी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे नाव काय असणार हे अद्याप ठरले नसले तरी यात नकुल मेहता आणि सुरभी चंदना मुख्य भूमिकेत असल्याचे म्हटले जात आहे. 

संजीवनी ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे. त्यांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे की, आयपीएल संपल्यानंतर ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका प्रेक्षकांना स्टार प्लस वाहिनीवर पाहायला मिळणार असून या मालिकेबाबत सध्या प्रोडक्शन हाऊस आणि वाहिनी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. या मालिकेची कथा वाहिनीला आवडली असून ही मालिका बिग बजेट मालिका असणार आहे. 

संजीवनी आणि दिल मिल गये या मालिकांप्रमाणेच ही मालिका देखील तितकीच भव्य बनवण्यात येणार आहे. या मालिकेचे निर्माते सिद्धार्थ मल्होत्रा यांनी मुंबई मिररशी बोलताना सांगितले आहे की, मी सध्या या मालिकेवर काम करत आहे. पण ही मालिका कधी सुरू होईल हे सगळे वाहिनीवर अवलंबून आहे. या मालिकेसाठी आम्ही लवकरच करारावर स्वाक्षरी करणार आहोत. 

या मालिकेत कोण कोण कलाकार मुख्य भूमिकेत असणार याबाबत मालिकेच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे.


Web Title: Popular TV show Sanjivani to return after IPL, Nakuul Mehta, Surbhi Chandna expected as leads
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.