Poonam Sinha with Lake Sonakshi, on the stage of 'Om Shanti Om' stage | लेक सोनाक्षीसह पूनम सिन्हा अवतरल्या 'ओम शांति ओमच्या' मंचावर

सोनाक्षी सिन्हाची आई पूनम सिन्हा आता सोनाक्षीसोबत म्युझिक रिॲलिटी शो 'ओम शांति ओम'च्या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये दिसून येणार आहेत. पूनम सिन्हा यांनी ह्या शोमधील स्पर्धकांना भरभरून मनोरंजन केले.या शोचे शूटिंग संपल्यानंतर त्यांनी ह्या सर्व स्पर्धकांसोबत छान वेळ घालवला इतकच नाही तर स्पर्धकांना त्यांनी भेटवस्तूही दिल्या. पूनम सिन्हा म्हणाल्या, “मी ओम शांति ओम नियमितपणे पाहते आणि कधीही हा शो चा एकही भाग चुकवलेला नाही.या शो च्या सेटवर मला खूप मजा आली आणि मला ह्या स्पर्धकांचे एक से एक परफॉर्मन्सेस पाहायला मिळाले. मला अभिमान वाटतो की सोनाक्षी  एवढ्‌या छान संकल्पनेवर आधारित असलेल्या शोचा हिस्सा आहे.”स्पर्धेचे परीक्षण करण्याव्यतिरिक्त, पूनम सिन्हा परीक्षकांसाठी रांगोळी स्पर्धाही भरवताना दिसून येतील.

सध्या सोनाक्षी तिचा एक्स बॉयफ्रेंड बंटी सचदेवला घेऊनदेखील चर्चेत होती.मात्र मॉम पुनम सिन्हाही आपल्या लेकीच्या आवडीवर जास्त खुश दिसत नाहीय.जेव्हा जेव्हा त्यांना सोनाक्षीच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले गेले त्यावर त्यांनी आपल्या लेकीचे लग्न हे प्रत्येक आईसाठी एक मोठे स्वप्न असते. त्यामुळे मी देखील सोनाक्षीसाठी काही खास स्वप्न पाहिली आहे.  सध्या सोनाक्षी लग्नासाठी तयार नाहीय, जेव्हा ती लग्नासाठी पूर्ण तयार असेन त्याचवेळी तिने लग्न करावे असे माझी ईच्छा आहे.सगळ्यात आधी माझा होणार जावई हा रणबीर कपूर सारखा गुड लुकिंग असायला पाहिजे.  

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यावर बरोबरच छोट्या पडद्यावरही खूप सक्रिय दिसते आहे. छोट्या पडद्यावर ही सोनाक्षीला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. छोट्या पडद्यावर ती सगळ्यांची फेव्हरेट अभिनेत्री बनली आहे. दोन वर्षांपूर्वी 'इंडियन आयडॉल'मधून छोट्या पडद्यावर तिने पदार्पण केले होते. तसेच 'नच बलिये'च्या आठव्या सीजनमध्ये परीक्षकाच्या  भूमिकेत झळकली होती. त्यावेळी देखील पुनम सिन्हा यांनी या मंचावर हजेरी लावली होती.आपल्या लेकीच्या लहानपणाच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता. सोनाक्षी सिन्हा सिनेमाप्रमाणेच छोट्या पडद्यावरही काम करावे अशी ब-याच वर्षापासून पुनम सिन्हा यांची ईच्छा होती.अगदी त्याचप्रमाणे सोनाक्षीने आपल्या आईच्या इच्छेनुसार छोट्या पडद्यावरही चांगले काम करत असल्याचे पुनम सिन्हा यांनी सांगितले होते. 
Web Title: Poonam Sinha with Lake Sonakshi, on the stage of 'Om Shanti Om' stage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.